बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा...

पनवेल : पनवेल महापालिकेच्या वतीने ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा' मोहिम हाती घेण्यात आली होती. या अंतर्गत पर्यावरणपुरक गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण १५ फेब्रुवारी रोजी आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये करण्यात आले. याप्रसंगी पर्यावरण विभाग उपायुक्त डॉ. वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त स्वरुप खारगे, पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण, स्पर्धा परीक्षक शिवानंद बालवदे, शामराव पुंडे, प्रशांत शेडगे, सचिन शिंदे, बक्षीस विजेते तसेच महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

महापालिका पर्यावरण विषयक विविध उपक्रम राबवित असते. जेव्हा नागरिकांचा सहभाग या उपक्रमामध्ये वाढतो तेव्हा ते यशस्वी होत असतात. शाश्वत विकास करायचा असेल तर त्याची सुरुवात घरापासून करावी लागेल. तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी महापालिका शाळा आणि महाविद्यालयाशी सामंजस्य करार करत आहे. विद्यार्थी नागरिक आणि महापालिका यांच्यामधील दुवा साधण्याचे काम करणार आहेत, असे महापालिका आयुवत गणेश देशमुख म्हणाले.

माझी वसुंधरा ४.० अंतर्गत ‘स्वच्छ, सुंदर आणि प्रदुषणमुक्त पनवेल'साठी पनवेल महापालिका विविध उपक्रम राबवित आहे. या अंतर्गतच सणाचे पावित्र्य आणि पर्यावरणाचे भान राखले जावे यासाठी आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा' मोहिम हाती घ्ोण्यात आली होती. या पर्यावरणपूरक गणपती उत्सव उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतलेल्या ‘पर्यावरण दूत' यांनाही यावेळी प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी केले.

पर्यावरणपुरक गणपती सजावट स्पर्धा निकालः
घरगुती दिड दिवस गणपती- इंद्रनील जाधव (प्रथम), भारत घरत (द्वितीय), विजय गोरेगावकर (तृतीय).
घरगुती पाच दिवस गणपती- आकाश  पाटील (प्रथम), माधुरी डांगे (द्वितीय), तानाजी तोत्रे (तृतीय).
घरगुती दहा दिवस गणपती- सुयोग सोनावणे (प्रथम), तेजस्वी वाघ (द्वितीय).
सार्वजनिक गणपती मंडळ- मोराज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (प्रथम), श्री गणेश मित्र मंडळ, टपाल नाका-पनवेल (द्वितीय), कस्तुरी प्लाझा-तक्का (तृतीय क्रमांक). 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पुरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यास चालढकलपणा