३० वर्ष जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेण्याचे आवाहन
‘वृक्षवल्ली प्रदर्शन'ला ठाणेकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने ‘वृक्षवल्ली-२०२४' या १३ व्या ‘झाडे, फुले, फळे, भाजीपाला प्रदर्शन'चे उद्घाटन ९ फेब्रुवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. ‘प्रदर्शन'च्या पहिल्याच दिवशी नागरिकांनीौ प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली असून सदर प्रदर्शन रेमंड रेस ट्रॅक, जे. के.ग्राम, पोखरण रोड नं.१ येथे आयोजित करण्यात आले आहे.
याप्रसंगी महापालिका उपायुक्त डॉ. मिताली संचेती, वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील उपस्थित होते. सदर ‘प्रदर्शन'मध्ये कुंड्यांमधील शोभिवंत पानांची झाडे (झुडपे), कुंड्यांतील शोभिवंत फुलझाडे, वामन वृक्ष, आमरी (ऑर्कीडस), कुंडीतील वृक्ष, हंगामी फुले, दांडीस (कट पलॉवर) इतर असे एकूण २२ विभाग आणि पोटविभाग आहेत. त्याचबरोबर शहरातील उद्याने आणि बागांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून यामध्ये लहान-मोठ्या अशा एकूण २५० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. तसेच या ‘प्रदर्शन'मध्ये बागांशी संबंधित वस्तू, उत्पादने, बांबूपासून तयार करण्यात आलेली शोभिवंत वस्तू आदिंचे जवळपास ४० पेक्षा जास्त स्टॉल्स आहेत.
‘वृक्षवल्ली प्रदर्शन'मध्ये लायन्स क्लब, मध्य रेल्वे, माहिम नेचर पार्क, एम.सी.एच.आय, लोढा ग्रुप, हिरानंदानी ग्रुप तसेच ७० ते ८० संस्था आणि नागरिक यांनी सहभाग घेऊन देखावे तयार केलेले आहेत. ‘वृक्षवल्ली प्रदर्शन-२०२४' अंर्गत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण उद्या ११ फेब्रुवारी रोजी सायं.६ वाजता होणार आहे.
दरम्यान, ‘वृक्षवल्ली प्रदर्शन'ला ठाणेकर नागरिकांना भेट द्यावी, असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.