खारघर मध्ये सिडको द्वारे कारवाई

खारघर : खारघर गाव येथे  सिडको भूखंडावर सुरु असलेले अनधिकृत बांधकाम ‘सिडको'च्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने  कारवाई करुन  जमीनदोस्त केले.

  खारघर सेक्टर-१३ मधील प्लॉट नंबर-६३ आणि प्लॉट नंबर-६४ या भूखंडावर एका ग्रामस्थाकडून अनधिकृत बांधकाम सुरु होते. चौथा मजल्याचे बेकायदा बांधकाम  सुरु असल्याची माहिती ‘सिडको'च्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाला प्राप्त झाल्यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता, अनधिकृत बांधकाम सुरु असल्याचे निदर्शनास येताच ‘सिडको'चे दक्षता विभाग अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग अधिकारी शशिकांत डावरे यांच्या पथकाने ७ फेब्रुवारी रोजी कारवाई करुन सदर बांधकाम जमीनदोस्त केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सार्वजनिक वापरासाठी असलेल्या भूखंडावर उद्यानाची उभारणी