कोकण विभागातील सर्व महसूल कार्यालयात ई-ऑफीस प्रणाली शंभर टक्के कार्यरत  

नवी मुंबई : कोकण विभागातील सर्व महसूल कार्यालयांमध्ये ई-ऑफीस प्रणाली 100 टक्के कार्यरत झाली आहे. त्यामुळे शासकीय कामकाजात गती येऊन कामकाज संपूर्णपणे कागद विरहित (पेपरलेस) होणार आहे. तसेच कामकाजात अधिक सुलभता आणि पारदर्शकता येणार आहे. ई-ऑफिसच्या वापरामुळे नागरिकांना काही प्रकरणांची कागदपत्रे आता मोबाईलवर देखील पाहता येणार आहेत.  

प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि कागद विरहित (पेपरलेस) होण्यासाठी राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ई-ऑफिस प्रणाली सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने कोकण विभागातील सर्व महसूल कार्यालयांमध्ये ई-ऑफीस प्रणाली कार्यरत करण्याचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले आहे. कोकण विभागातील महसूल कार्यालयांमध्ये ई-ऑफीस प्रणाली 100 टक्के कार्यरत झाल्याने शासकीय कामकाजात गती येणार आहे, शिवाय कामकाज संपूर्णपणे कागदविरहीत (पेपरलेस) होणार असल्याने कामकाजात अधिक सुलभता आणि पारदर्शकता येणार आहे.  

ई-ऑफिसच्या वापरामुळे काही प्रकरणांची कागदपत्रे नागरिकांना मोबाईलवर पाहता येणार आहेत. कोकण विभागातील महसूल कार्यालयांमध्ये कार्यरत करण्यात आलेल्या ई-ऑफिस प्रणालीचा मंगळवारी आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आढावा घेतला. तसेच कोकण विभागातील सर्व महसूल कार्यालयांमध्ये ई-ऑफीस प्रणाली कार्यरत करण्याचे काम वेगाने पूर्ण केल्याने त्यांनी सर्व महसूल यंत्रणेचे अभिनंदन केले.  

डॉ.महेंद्र कल्याणकर (आयुक्त - कोकण विभाग)

महसूल कार्यालयात येणारी सर्व प्रकरणे यापुढे ई-ऑफिस प्रणालीव्दारे नोंदविण्यात यावीत. संपूर्ण महसूल विभागात ई-ऑफिस प्रणाली 100 टक्के राबविण्यात येवून प्रशासनात गतिमानता आणावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापक व योग्य वापर करुन शासकीय कामकाज सुलभ करता येऊ शकते. या ई-ऑफीस प्रणालीचा इतर विभागांनी देखील अवलंब करावा.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

फेरीवाला धोरणात महापालिका अधिकाऱ्यांची मनमानी?