खारघर मधील ४ फुटबॉल मैदानांचे काम पूर्ण  

खारघर : सिडको तर्फे खारघर मध्ये फुटबॉल मैदान आणि गॅलरी उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मैदानात रंगणाऱ्या फुटबॉल सामन्यांचा आनंद क्रीडाप्रेमींना घेता येणार आहे.  

मुंबई शहरातील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) धर्तीवर सिडको द्वारे खारघर सेक्टर-३३ मध्ये १०.७ हेक्टर जमिनीवर फुटबॉल खेळासाठी चार फुटबॉल मैदाने विकसित करण्यात आली आहेत. या चारही मैदानांचे काम पूर्ण झाले आहे. सिडको तर्फे ११५ बाय ७८ मीटर लांबी इतवया आकाराचे प्रत्येक फुटबॉल मैदान तयार करण्यात आले असून, चारपैकी तीन फुटबॉल मैदानात टेक्स्टाईल कापड, ८ इंच रेती, २ इंच खडी, गुजरात कच्छ येथील रेती टाकून नैसर्गिक गवत तयार करण्यात आले आहे. तर चौथे मैदान कृत्रिम गवताचे आहे. या मैदानात फुटबॉलचे सामने रंगणार असून, या मैदानांच्या दोन्ही बाजूने सुरु असलेले सात हजार प्रेक्षक गॅलरीचे काम पूर्ण झाले आहे.  सर्व फुटबॉल मैदाने ‘फिफा'ची तांत्रिक मार्गदर्शक तत्वे वापरुन बनविण्यात आली आहेत. या फुटबॉल मैदानात ‘फिफा'चे आतरराष्ट्रय सामने खेळणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे खारघर मध्ये उभारण्यात आलेल्या फुटबॉल मैदानांचे देश-विदेशातील खेळाडूंनी तोंड भरुन कौतुक केले आहे.

दरम्यान, सिडको द्वारे खारघर सेक्टर-३३ मध्ये ४ फुटबॉल मैदाने बनविण्यात आली आहेत. चौथा फुटबॉल मैदानाच्या दोन्ही बाजूने उभारण्यात आलेल्या प्रेक्षक गॅलरीचे  काम पूर्ण झाले आहे. गॅलरीवर बाहेरील देशात तयार होणारे नाविन्यपूर्ण कापडी छत बसविण्यात येणार आहे. त्यासाठी मोजमाप दिले आहे. चारही फुटबॉल मैदानांचे काम पूर्ण झाले असून, बाहेरील किरकोळ काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे, असे सिडको अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल परिसरातील पाणी पुरवठ्यामधील अडचणी दूर करण्याचे निर्देश