३० वर्ष जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेण्याचे आवाहन
डॉ.आनंदराव सूर्यवंशी यांचा ‘अहिराणी बोलस गीता' ग्रंथ प्रकाशित
नवी मुंबई ः विश्व मराठी संमेलन, वाशी येथे २९ जानेवारी रोजी मराठी भाषा आणि शालेय शिक्षण मंत्री तथा पालक मंत्री मुंबई शहर दीपकजी केसरकर यांच्या हस्ते माजी शिक्षण अधिकारी डॉ.आनंदराव सूर्यवंशी यांनी अहिराणी बोली भाषेत अनुवाद केलेल्या ‘अहिराणी बोलस गीता' या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.
या प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजा दीक्षित, भाषा सल्लागार समिती मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ लेखक, समीक्षक शिवाजी गावडे आणि लेखक डॉ. आनंदराव सूर्यवंशी हे मान्यवर उपस्थित होते. अहिराणी भाषेतील या ‘अहिराणी बोलस गीता' ग्रंथाचे समयसूचकतेने प्रकाशन केल्याबद्दल विश्व मराठी संमेलन समिती आणि मराठी भाषा आणि शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे डॉ. सूर्यवंशी यांनी आभार मानले.