खारघर मधील कांबळे दाम्पत्याला अयोध्येत श्रीराम पुजेचा मान

खारघर : अयोध्या येथे येत्या २२ जानेवारी रोजी भगवान श्रीरामाच्या मूर्तीचा ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रभू श्रीरामाची पुजा करण्याचा मान खारघर मधील कांबळे दाम्पत्याला मिळाला आहे. विठ्ठल कांबळे आणि उज्वला कांबळे अशी या मानकऱ्यांची नावे आहेत

अयोध्या मधील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या सोहळ्यासाठी मंदिराच्या न्यास समितीने जोरदार तयारी केली आहे. या सोहळ्यासाठी देशासह जगभरातील मान्यवर हजेरी लावणार आहेत. राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याचा बहुमान देशातील ११ दाम्पत्यांना मिळाला आहे. त्यामध्ये खारघर मधील  कांबळे दाम्पत्याचा सामावेश आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या गर्भगृहात पुजा करण्याचा सौभाग्य या कांबळे कुटुंबियांना मिळणार आहे.

त्याकरिता राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याच निमंत्रण ३ जानेवारी रोजी कांबळे कुटुंबियांना मिळाले आहे. या सोहळ्याकरिता कांबळे दाम्पत्य २० जानेवारी रोजी आयोध्याकडे रवाना होणार आहेत. खारघर, सेक्टर-२१ मधील हावरे स्प्लेंडर येथे विठ्ठल कांबळे वास्तव्यास आहेत. कांबळे आरएसएस स्वयंसेवक असून त्यांना मिळालेल्या या बहुमानाबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘क्रेडाई- बीएएनएम रायगड'तर्फे ७ व्या प्रॉपर्टी प्रदर्शनाची घोषणा