नवी मुंबई महापालिकेचा ३२ वा वर्धापन दिन जल्लोषात साजरा

विविध प्रकल्प, उपक्रमांमुळे महापालिकेचे वेगळेपण -आ. मंदाताई म्हात्रे

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचा ३२ वा वर्धापन दिन १ जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. यानिमित्त १ जानेवारी रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार गणेश नाईक ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले विजयकुमार म्हसाळ, प्रशासन विभागाचे उपायुक्त शरद पवार, शहर अभियंता संजय देसाई, मुख्य लेखा-वित्त अधिकारी सत्यवाळ उबाळे, मुख्य लेखा परीक्षक जितेंद्र इंगळे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

नवी मुंबई नावलौकीक प्राप्त शहर असून नवी मुंबईच्या प्रगतीत येथील नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी-कर्मचारी यांचा महत्वाचा वाटा आहे. कोव्हीड काळात आपल्या जीवाची पर्वा न करता महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी केलेले काम तसेच शहराची गुणवत्ता कायम राखण्यासाठी नियमित केले जाणारे काम प्रशंसेस पात्र असल्याचे गौरवोद्‌गार आ. गणेश नाईक यांनी यावेळी काढले.

यावेळी बोलताना आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सुरुवातीपासूनच नवी मुंबई महापालिकेने विविध प्रकल्प, उपक्रम यामध्ये आपले वेगळेपण टिकवून ठेवले आहे. त्यामुळे नवी मुंबईची लोकप्रतिनिधी असल्याचा अभिमान वाटतो असे मत व्यक्त केले. तसेच आगामी काळात नवी मुंबईत जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ, बटरपलाय गार्डन उभे राहावे, अशी संकल्पना मांडली.

तर ग्रामपंचायतीतून थेट महापालिका मध्ये रुपांतरीत झालेली नवी मुंबई देशातील पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्था असून स्थापनेपासूनच प्रत्येक बाबीत आपले वेगळेपण जपले आहे. आज स्वच्छता आणि सुशोभिकरणात नवी मुंबई देशात आघाडीवर असून आजवरच्या नावलौकीकात महापालिका प्रशासनाप्रमाणेच येथील सक्रिय लोकप्रतिनिधी, जागरुक नागरिक यांचाही सिंहाचा वाटा असल्याचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी विेशेषत्वाने नमूद केले. मागील वर्षभरात नवी मुंबई महापालिकेला राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर लाभलेल्या पुरस्कार, सन्मानांचा उल्लेख करीत आयुवतांनी सुरु असलेले प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण केल्याचा निर्धार व्यक्त केला. यापुढील काळात स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणशील शहराचा बहुमान उंचावण्यासाठी महापालिका सर्वांच्या एकत्रित सहयोगाने कटीबध्द असल्याचे सांगून याकामी सर्वांचाच सक्रिय पाठिंबा मिळेल, असा विश्वास आयुक्त नार्वेकर यांनी व्यक्त केला.वर्धापन दिनानिमित्त अधिकारी, कर्मचारीवृंदाने सादर केलेल्या गीत, नृत्य कलाविष्कारांना उपस्थितांनी कौतुकाची दाद दिली.

दरम्यान, नवी मुंबई महापालिकेच्या ३२ व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिका मुख्यालय इमारतीस आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ३१ डिसेंबर रोजी नववर्षारंभादिनानिमित्त मुख्यालय ठिकाणी मध्यरात्री बारा वाजता नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत नववर्षाचे केले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उत्पादनात घट; लसूण फोडणी महाग