ग्रंथालयांसाठी ग्रंथसंच भेट देत डॉ. प्रकाश आमटे प्रेमींनी केले वाढदिवस अभिष्टचिंतन

ग्रंथभेटी देऊन पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे यांचा वाढदिवस केला साजरा

नवी मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यावर प्रकाशित झालेल्या १) प्रकाशवाटा २)समिधा ३) नेगल ४) रान मित्र ५) आणि चांदणे उन्हात हसले या ५ पुस्तकांचे ७५ संच पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने त्यांचा शुभ हस्ते ७५ ग्रंथालयासाठी देण्याचा ग्रंथभेट सोहळा साहित्य मंदिर सभागृह, वाशी येथे २६ डिसेंबर रोजी संपन्न झाला.

कार्यक्रमाचे आयोजन आनंदवन मित्र मंडळ, नवी मुंबई व प्रभात चँरिटेबल ट्रस्ट नवी मुंबई यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. सुरूवात अमर दूडाम याच्या आनंदवन प्रार्थना गायनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्थाविक डॉ. प्रशांत थोरात यांनी केले तर आभार सुभाष कुळकर्णी यांनी केले. या प्रसंगी ठाणे ग्रंथालयाचे प्रशांत पाटील, डॉ अजित मगदुम, डॉ अशोक पाटील, प्रा प्रताप महाडीक, थळे सर, मधुकर वारभुवन इ. मान्यवर उपस्थीय होते. या कार्यक्रमाचे नियोजन जीवन निकम यांनी केले तर सूत्रसंचालन अमरजा चव्हाण यांनी केले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोरोना रुग्णांत वाढ, वाढवली चिंता