ठाणे महापालिका तर्फे अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामांवर कारवाई

दिवा, कळवा, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती विभागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

ठाणे : २५ डिसेंबर रोजी ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा, कळवा, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती विभागातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार महापालिका अतिक्रमण विभाग, परिमंडळ यांनी सदर कारवाई केली आहे.

या कारवाईत दिवा प्रभाग समिती मधील एम. एस. कम्पाऊंड येथील तीन मजली अनधिकृतबांधकाम पूर्णतः पाडण्यात आले. तसेच, दुसऱ्या बांधकामाचे प्लिंथ, २५०० चौरस फूटांचे बांधकाम, २५ कॉलम तोडण्यात आले. त्याशिवाय, दोन मजल्याचे आरसीसी बांधकाम, ४० कॉलमचे प्लिंथचे बांधकाम तोडण्यात आले. दोन पोकलेन, तीन जेसीबी, ५० कामगार, ४० पोलीस कर्मचारी आणि आरक्षक यांच्या सहाय्याने सदर कारवाई करण्यात आली.

दिवा पूर्व येथे मुंब्रा देवी कॉलनी मधील २२ कॉलमचे प्लिंथचे बांधकाम तसेच फाउंडेशनची दोन बांधकामे एक पोकलेन, दोन जेसीबी, ३० कामगार आणि ३० पोलीस यांच्या सहाय्याने पूर्णपणे काढण्यात आली.

कळवा प्रभाग समिती हद्दीतील स्वामी समर्थ मठाजवळील ३५ खोल्यांचे बांधकाम एक पोकलेन, दोन जेसीबी, ४० कामगार, ३० पोलीस यांच्या सहाय्याने पाडण्यात आले. तर, विटावा येथे प्लिंथचे बांधकाम काढण्यात आले. येथे एक पोकलेन, दोन जेसीबी, ३० कामगार, ३० पोलीस कार्यरत होते.

माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती हद्दीतील बाळकूम येथील स्मशानभूमीसमोर लागून असलेले सहा मजल्याच्या आरसीसी बांधकामातील पाचव्या आणि सहाव्या मजल्याचे बांधकाम काढण्यात आले. त्यासाठी तीन ट्रॅक्टर ब्रेकर, एक पोकलेन, दोन जेसीबी, ३० कामगार आणि ३० पोलीस यांचे सहाय्य घेण्यात आले.

महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे यांच्या विरोधात नियोजनबध्द धडक कारवाई सर्वच प्रभाग समिती क्षेत्रात टप्प्याटप्प्याने हाती घेतली जाणार आहे, असे ठाणे महापालिका द्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जगप्रसिध्द घारापुरी बेटावर पाणी टंचाईचे संकट