लक्षणीय कामगिरी करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान

छावा प्रतिष्ठान, नवी मुंबईच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण संपन्न

नवी मुंबई :  छावा प्रतिष्ठान, छावा शिवकालीन बहुउद्देशिय कलामंच, नवी मुंबई या संस्थेच्या पुढाकाराने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वस्ताद अमित गडांकुश यांच्या मार्गदर्शनाखाली २२ डिसेंबर रोजी वाशी सेवटर ६ येथील साहित्य मंदिर सभागृहात छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार २०२३ व इंडियन नॅशनल अवार्ड २०२३ पुरस्कार वितरणाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमास माजी आमदार संदीप नाईक, युवा नेते वैभव नाईक, सुभेदार कुणाल मालुसरे, मुरलीधर पेटकर, ए.सी.पी राज खतीब, आर पी. एफ चे आय जी. यश मिश्रा, ए.पी.आय. विजय राऊत, ग्रॅण्ड मास्टर किम योन्ग हो, मास्टर चोन जिहुम, अभिनेते संभाजी माने, अभिनेते बलराज माने, मास्टर चोन हायउंगो, डॉ. पार्क जाँगवयू उपस्थित होते. शिवकालीन मर्दानी खेळाचा कार्यक्रम पाहुन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळातील मावळ्यांची आठवण करून देणारी व शिवकालीन मर्दानी खेळाचा वारसा जपणारी  ही कला लोकांनी विसरू नये म्हणुन या कलेची जागृती केल्याबद्दल तसेच शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम पाहुन व छावा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातुन वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींच्या कलागुणांना लक्षात घेऊन त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित केल्याबद्दल संंदीप नाईक यांंनी आपल्या भाषणात छावा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वस्ताद अमित गडांकुश सर यांची प्रशंसा करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शाहीर वैभव घरत यांच्या पोवाड्याने सभागृहाला शिवकाळात नेऊन सोडले. सदर प्रसंगी विविध क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या व्यवितमत्वांना मानाचे छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार २०२३ व इंडियन नॅशनल अवार्ड २०२३ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल फेस्टिवल 2023 चे आयोजन