ठाणे जिल्ह्यात ‘विकसित भारत संकल्प यात्रा'चा दिमाखात शुभारंभ

शासकीय अधिकारी-कर्मचारी अन्‌ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे : ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ २५ नोव्हेंबर रोजी शासकीय अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.
भिवंडी तालुक्यातील अस्नोली ग्रामपंचायत क्षेत्रातील कृषि उत्पन्न  बाजार समिती सभागृह येथील ‘विकसित भारत संकल्प यात्रा'च्या शुभारंभ प्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी, ठाणे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे, भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप, विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने, ठाणे जिल्हा कृषी अधीक्षक दीपक कुटे, ठाणेजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे यांच्यासह इतर शासकीय विभागांचे अधिकारी, शासकीय लाभार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे गटविकास अधिकारी प्रदीप घोरपडे यांनी अतिशय उत्तम नियोजन केले होते.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉलची उभारणी, आरोग्य शिबिर, सिकलसेल, क्षयरोग तपासणी आणि औषधोपचार शिबीर, उज्वला योजनेची नोंदणी आणि लाभार्थ्यांना लाभ, आरसीएफ कंपनीतर्फे ड्रोन द्वारे कीटकनाशक फवारणी प्रात्यक्षिक, आदी विविध उपक्रम राबविण्यात आले.

 केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा' २५ नोव्हेंबर पासून सुरु झाली असून, या यात्रेचा समारोप २४ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. या यात्रेसाठी मोठ्या ४ डिजिटल स्क्रीन असलेल्या व्हॅन सज्ज करण्यात आल्या असून, या व्हॅन ठाणे जिल्हयांतर्गत ४३१ ग्रामपंचायती क्षेत्रात फिरविल्या जाणार आहेत. त्यापैकी भिवंडी तालुवयातील अस्नोली, शहापूर तालुवयातील बोरशेती, अंबरनाथ तालुवयातील पोसरी, कल्याण तालुवयातील जांभूळ या ४ ठिकाणी २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ‘विकसित भारत संकल्प यात्रा'चा शुभारंभ झाला.

‘विकसित भारत संकल्प यात्रा'च्या माध्यमातून विविध शासकीय योजनांची प्रसिध्दी केली जाणार असून, गरजू लाभार्थ्यांचा शोध घेणे, त्यांना प्रत्यक्ष योजनांची माहिती देणे, त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे, आदी उपक्रम अगदी तळागाळापर्यंत राबविले जाणार आहेत. त्या दृष्टीने केंद्रीय ‘नीती आयोग'च्या संचालक जागृती सिंगला, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोरपणे नियोजन करण्यात आले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

स्वच्छ उरण सुंदर उरण