३० वर्ष जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेण्याचे आवाहन
नवी मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा पार पडली सुरळीत
नवी मुंबई : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील पोलिस शिपाई भरतीच्या मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या 1830 उमेदवारांची लेखी परिक्षा रविवारी 7 जुलै रोजी सकाळी वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात कडेकोट बंदोबस्तात व सीसीटीव्ही च्या निगराणीत सुरळीत पार पडली. या लेखी परिक्षेत 10 पुरुष व 2 महिला उमेदवार गैरहजर राहिले.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील रिक्त असलेल्या 185 पोलिस शिपाई भरतीसाठी 5984 उमेदवारांनी अर्ज केले होते. यातील मैदानी चाचणीत 1399 पुरुष व 443 महिला व 71 माजी सैनिक असे एकूण 1842 उमेदवार पात्र ठरले होते. यापैकी 10 पुरुष व 2 महिला उमेदवार गैरहजर राहिल्याने 1389- पुरुष व 441- महिला अशा एकुण 1830 उमेदवारांची लेखी परिक्षा रविवारी वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये सकाळी 10 ते 11.30 या कालावधीत सुरळीत पार पडली.
सदरची लेखी परिक्षा ओएमआर तंत्रज्ञानावर आधारित घेण्यात आली. उमेदवारांकडून लेखी परीक्षे दरम्यान कोणत्याही छुप्या गॅझेटचा उदा. मोबाईल, ब्ल्युटयुथ, मायक्रोचिप इत्यादीचा वापर होऊ नये यासाठी डीएफएमडी व एचएचएमडी यंत्रणेव्दारे उमेदवारांची फ्रिस्किंग करण्यात आली. मैदानी चाचणी दरम्यान घेण्यात आलेले उमेदवारांचे बायोमेट्रिक ठसे जुळल्यानंतरच या उमेदवारांना लेखी परिक्षेसाठी प्रवेश देण्यात आला.
या लेखी परिक्षेदरम्यान उमेदवारांकडून कोणत्याही गैरप्रकारांचा अवलंब होऊ नये यासाठी पीटीझेड सुविधा असणारी सीसीटीव्ही यंत्रणा परिक्षा केंद्राच्या आत व बाहेर कार्यान्वित करण्यात आली होती. त्याशिवाय पोलीस पर्यवेक्षकांची प्रत्यक्ष नजर प्रत्येक विद्यार्थ्यांवर ठेवण्यात आली होती. त्यामुळे ही लेखी परिक्षा सुरळीत पार पडली. पारदर्शक पद्धतीने पार पडलेल्या या लेखी परीक्षे दरम्यान कोणताही गैरप्रकार घडला नाही.
परीक्षा केंद्राच्या ठिकाणी येणा-या उमेदवारांची कोणतीही गैरसोय होऊ नये याकरिता नवी मुंबई पोलिसांकडुन वैद्यकीय सेवा, फिरते शौचालय, पाणी, खाद्यगृहाचे स्टॉल इत्यादी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली होती. दुर अंतरावरून येणाऱया उमेदवारांना परीक्षा केंद्रापर्यंत वेळेत पोहोचता यावे, याकरिता पनवेल, मानसरोवर तसेच वाशी रेल्वे स्टेशन वरुन परिक्षा केंद्रापर्यंत येण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून शासकीय वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.