वाशी सार्वजनिक रुग्णालयाची नवनियुवत आयुवतांकडून प्रत्यक्ष पाहणी


नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यापासून डॉ. कैलास शिंदे यांनी विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यास पहिल्या दिवसापासूनच सुरुवात केली असून त्यासोबतच क्षेत्रीय भेटींद्वारे प्रत्यक्ष पाहणीलाही सुरुवात केली आहे.
या अनुषंगाने आयुक्त डॉ. शिंदे यांनी ३ एप्रिल रोजी वाशी येथील महापालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयाला भेट देत तेथील कामकाजाचा बारकाईने आढावा घेत सुधारणेच्या दृष्टीने मौलिक सूचना केल्या. महापालिकेच्या वाशी, नेरुळ आणि ऐरोली या ३ रुग्णालयांपैकी वाशी रुग्णालयामध्ये नागरिक सर्वाधिक संख्येने उपचारासाठी येत असतात. त्याठिकाणची दैनंदिन बाह्यरुग्ण (ओपीडी) संख्याही अधिक आहे. त्यादृष्टीने तेथे नागरिकांसाठी पुरेशी बैठक व्यवस्था, पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध असावे. तसेच तेथील प्रदर्शनी भागात आरोग्यविषयक माहिती देणारे पोस्टर्स, डिजीटल फलक अशी आरोग्य सुचनांची प्रचारसाधने वाढवावीत, असे निर्देश आयुवत डॉ. शिंदे यांनी दिले.
तळमजल्यासह तिन्ही मजल्यांवरील वैद्यकीय सेवांची पाहणी करताना तेथील हवा खेळती राहण्याच्या दृष्टीने तत्परतेने उपाययोजना कराव्यात. अंतर्गत स्थापत्य आणि रंगरंगोटीची कामेही जलद करुन घ्यावीत. रुग्णालयात येणाऱ्या व्यक्तीला प्रसन्न वातावरण लाभावे यादृष्टीने कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे अंतर्गत स्वच्छतेवर अधिक लक्ष द्यावे. रुग्णांना देण्यात येणाऱ्या भोजनाचा दर्जाही उत्तम राहील याकडे विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.
रुग्णालयातील बाह्यरुग्ण कक्ष, क्ष-किरण, सोनोग्राफी आणि सिटी स्कॅन कक्ष, पॅथोलॉजी, औषध वितरण कक्ष, अपघात विभाग, आपत्ती कक्ष, रक्तपेढी, आयसीयू, डायलिसीस, एनआयसीयू, प्रसूतीपूर्व कक्ष, शल्यचिकित्सा कक्ष, मेडिकल वॉर्ड, बालरोग विभाग, थॅलेसेमिया काळजी कक्ष, अस्थिव्यंग कक्ष, प्रसुती पश्चात कक्ष, औषध भांडार विभाग, मेडिकल रेकॉर्ड विभाग अशा विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी करीत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी तेथील सुधारणांविषयी सूचना केल्या. याप्रसंगी त्यांच्यासमवेत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, शहर अभियंता संजय देसाई, उपायुक्त योगेश कडुसकर, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. रविंद्र म्हात्रे, कार्यकारी अभियंता अजय संख्ये, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय गडदे, वाशी विभाग अधिकारी सागर मोरे आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
नवजात अतिदक्षता विभागाची पाहणी करताना तेथील बाळांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दूध बँक सुरु करण्यात यावी. त्याचप्रमाणे थॅलेसेमिया डे-केअर कक्षाची पाहणी करताना आयुक्तांनी सिकल सेल ॲनेमियाचे सेंटर अद्ययावत करण्याच्या सूचना केल्या. औषध भांडार विभागाची पाहणी करय तेथील औषधे आवक-जावक पध्दती त्यांनी जाणून घेतली. सर्व रुग्णालये आणि नागरी आरोग्य केंद्रे याठिकाणच्या औषध साठ्यावर केंद्रीय नियंत्रण रहावे. त्या अनुषंगाने औषध खरेदी प्रणाली विकसीत करावी आणि सर्व कामकाज ऑनलाईन असावे यादृष्टीने तत्पर कार्यवाही करावी. अशाच प्रकारे रुग्णालयाच्या मेडिकल रेकॉर्ड विभागाचेही संपूर्ण डिजीटलायजेशनची गतीमान कार्यवाही करावी, असे आयुक्त डॉ. शिंदे निर्देशित व्ोÀले.
वाशी येथील रुग्णालय महापालिकेच्या रुग्णालयांमधील सर्वात जुने आणि सर्वात जास्त सेवा देणारे असल्याने या रुग्णालयावरील रुग्णांचा ताण विभागला जावा यादृष्टीने नेरुळ आणि ऐरोली रुग्णालयांचे अधिक सक्षमीकरण करण्याची जलद कार्यवाही करण्याबाबतही आरोग्य विभागास सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे वाशी रुग्णालयात येणारे विविध प्रकारचे रुग्ण लक्षात घेता त्या ठिकाणी २४ तास पोलीस कक्ष असावा यादृष्टीनेही कार्यवाही करण्याचे निर्देश आयुवत डॉ. कैलास शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना औषधचि्ीी न देता रुग्णालयामार्फतच औषध पुरवठा करण्यात येतो. या प्रिस्क्रीप्शन फ्री सेवेची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. याबाबतची कोणतीही तक्रार प्राप्त होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात यावी. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाचा केसपेपर काढण्यापासून ते आंतररुग्ण (आयपीडी) सेवा घेऊन तो बरा होऊन परत जाईपर्यंतच्या कार्यालयीन नोंदी डिजीटल स्वरुपात घेतल्या जाव्यात. यादृष्टीने एचएमआयएस (हॉस्पिटल मॅनेजमेंट इंटिग्रेटेड सिस्टीम) प्रणाली अद्ययावत करण्याचे आणि पेपरलेस कामकाजाच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही करण्यात यावी.
-डॉ. कैलास शिंदे, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल मध्ये विविध स्पर्धांच्या माध्यमातून मतदार जनजागृती