पनवेल महापालिकेची आजवरची सर्वाधिक विक्रमी करवसुली

पनवेल ः पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात ३६० कोटींची वसुली केली असून सदरचा आजवरील सर्वाधिक वसुलीचा विक्रम आहे. माजी आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाने गेले वर्षभर नियोजनबध्द पध्दतीने रुपरेषा आखून कर वसुलीचा विक्रम केला आहे. मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त गणेश शेटे यांच्या नियंत्रणाखाली योग्य उपाययोजना राबविल्याने एवूÀण ६४७ कोटी इतका महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. नुकत्याच झालेल्या सुनावणीनुसार उच्च न्यायालयाने पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता कर आकारणीस महापालिकेला कोणतीही स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी मालमत्ता कर भरुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मालमत्ता कर विभागाचे उपायुवत गणेश शेटे यांनी केले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

७०० पेक्षा अधिक बिगर गाळाधारक व्यापारी परवान्यांचे नूतनीकरण लांबणीवर