पेठपाडा मेट्रो रेल्वे स्टेशन मुख्य रस्त्यावरील पथदिवे बंद

खारघर : खारघर सेक्टर-२७ कडून पेठपाडा मेट्रो रेल्वे मार्गे खारघर सेक्टर-३४ कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे बस आणि मेट्रो मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पेठपाडा मेट्रो रेल्वे मार्गे खारघर सेक्टर-३४ कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर रात्री अंधारातुनच मार्ग काढावा लागत आहे. यापूर्वी सदर रस्त्यावर रात्री लुटमारी होण्याचे प्रकार घडले आहे. त्यामुळे पेठपाडा मेट्रो रेल्वे मार्गे खारघर सेक्टर-३४ कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील बंद असलेले पथदिवे पनवेल महापालिका प्रशासनाने सुरु करावेत, अशी मागणी सदर मार्गावरील प्रवाशी करीत आहेत.

खारघर सेक्टर-२७ मधील सेंट्रल पार्क आणि बी. डी. सोमाणी शाळेकडून पेठपाडा मेट्रो रेल्वे स्थानक मार्गे खारघर सेक्टर-३४ कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पथदिवे गेल्या महिनाभरापासून बंद असल्यामुळे रस्त्यावर आणि मेट्रो रेल्वे पुलाखाली रात्री अंधार पसरत आहे. विशेष म्हणजे पेठपाडा मेट्रो रेल्वे स्टेशन शेजारी एनएमएमटी बस थांबा आहे. खारघर सेक्टर-३० ते सेवटर-३५ आणि पेठगाव, रांजणपाडा गाव तसेच खारघर सेक्टर-२७ परिसरात राहणारे नागरिक कामानिमित्त बस आणि नवी मुंबई मेट्रो मधून प्रवास करतात. विशेष म्हणजे दिवाळी पूर्वी सदर रस्त्यावर पथदिवे नसताना रात्रीच्या वेळी लुटमारीचे प्रकार घडल्याचे नागरिकांनी सांगितले. रस्त्यावरील पथदिवे बंद असल्यामुळे रात्री काळोखात उभे राहून प्रवाशांना बसची वाट पाहावी लागते. त्यामुळे भविष्यात अंधारामुळे सदर रस्त्यावर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका विद्युत विभागाने पेठपाडा मेट्रो रेल्वे स्थानक मार्गे खारघर सेक्टर-३४ कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील बंद असलेले पथदिवे त्वरित सुरु करावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

दरम्यान, पेठपाडा मेट्रो रेल्वे स्थानक मार्गे खारघर सेक्टर-३४ कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याबाबत पनवेल महापालिकेचे मुख्य अभियंता प्रीतम पाटील यांच्याशी संपर्क केला असता होवू शकला नाही.

पेठपाडा मेट्रो रेल्वे स्थानक मार्गे खारघर सेक्टर-३४ कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. याविषयी पनवेल महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, या पत्रव्यवहाराकडे महापालिका विद्युत विभाग दुर्लक्ष करीत आहे. - दीपक शिंदे, सरचिटणीस - खारघर मंडल भाजपा.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मतदारांनी मतदानाचा हवक बजावण्यासाठी डोंबिवली मध्ये ‘स्वाक्षरी मोहीम'