‘मध्य रेल्वे'ची वाहतूक विस्कळीत  

कल्याण : ओव्हरहेड वायरमध्ये पेंटाग्राफ अडकल्याने २८ मार्च रोजी ‘मध्य रेल्वे'ची वाहतूक विस्कळीत झाल्याची घटना घडली. कल्याण आणि ठाकुर्ली दरम्यान दुपारी १२.३० च्या दरम्यान लोकलचा पेंटाग्राफ अडकला होता. यामुळे मुंबईकडून कल्याणला जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने याचा जलद मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.

ठाकुर्ली आणि कल्याण रेल्वे स्थानकाच्या दरम्यान मुंबई कडून कल्याण दिशेने जाणाऱ्या लोकलच्या ओव्हरहेड वायरला पेंटाग्राफ अडकल्यामुळे वायर तुटली.  यामुळे लोकल तब्बल सव्वा तास एकाच ठिकाणी थांबून होती. फास्ट ट्रॅकवर वायर तुटल्यामुळे जलद गाड्यांचा वेळापत्रक कोलमडले होते. यानंतर दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे मधील नालेसफाईची कामे १५ एप्रिल पासून सुरु करावीत