‘पलेमिंगो सिटी'ची ओळख वाचवा, पाणथळ जागा संरक्षित करा

नवी मुंबई : सनदी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची ‘सिडको'च्या सह-व्यवस्थापकीय संचालक पदावरुन नवी मुंबई महापालिका आयुक्त म्हणून बदली झाल्याने, पर्यावरणवाद्यांनी त्यांच्याकडे ‘पलेमिंगो सिटी'ची संकल्पना नष्ट होणार नाही याची काळजी घेण्याची कळकळीची विनंती केली आहे. 

आयुवत डॉ. कैलास शिंदे यांनी गेल्या महापालिकामध्ये पहिल्याच दिवशी जाहीर केले की, त्यांनी ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले असल्याने शहरातील समस्यांबाबत त्यांना माहिती आहे. नवीन आयुक्त डॉ. शिंदे यांची भेट घेऊन  ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी ‘सिडको'च्या तीव्र विरोधादरम्यान पलेमिंगो गंतव्यस्थान अर्थात पाणथळ जागा, संरक्षित करण्याच्या महापालिकेच्या पूर्वीच्या वचनाची त्यांना आठवण करुन दिली. 

शिंदे यांच्यासाठी आता करणे-किंवा-न-करणे एक कठीण समस्या आहे, ते आम्हाला माहित आहे. या संदर्भात, डीपीएस पलेमिंगो तलावात आणि बाहेर जाणाऱ्या पलेमिंगोच्या मार्गात आलेला राक्षसी साईन बोर्ड तोडून टाकण्याची खात्री करण्यासाठी ‘नॅटकनेवट'ने शिंदे यांचे कौतुक केले. साईन बोर्डवर आदळून तब्बल ७ गुलाबी पक्ष्यांचा मृत्यू झाला. ‘नवी मुंबई'ला ‘पलेमिंगो सिटी'चे नाव देण्यासाठी ‘नॅटकनेवट'ने सर्वप्रथम महापालिकेला सूचना करुन नंतर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले.  त्यानंतर महापालिकेने स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत टॅगला परवानगी देण्यासाठी केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाला पत्र लिहिले, असे बी. एन. कुमार यांनी सांगितले.

आयुवत डॉ. शिंदे यांना दिलेल्या लेखी सबमिशनमध्ये, ‘नॅटकनेवट'ने सुरवातीला दोन मुद्दे मांडले आहेत. पाणथळ क्षेत्रांचे संरक्षण आणि मोकळ्या जागा. पर्यावरणवाद्यांनी महापालिकेला डीपीएस पलेमिंगो तलावा जतन करण्याची विनंती केली होती, जी उच्च न्यायालयाच्या निकालाने देखील संरक्षित आहे. तत्कालीन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘सिडको'ला  विनंती केली होती की, ते एक प्रमुख पलेमिंगो गंतव्यस्थान असल्याने डीपीएस तलावाची देखरेख करण्यासाठी महापालिकेला परवानगी द्यावी, असे कुमार म्हणाले.

पर्यावरणवाद्यांनी आता नवे आयुवत डॉ. कैलास शिंदे यांना तीच बाब पुढे नेण्याची विनंती केली. मोकळ्या जागांच्या संदर्भात, कुमार यांनी निदर्शनास आणून दिले की २३२ उद्याने आणि ९१ क्रीडांगणे असूनही, महापालिका क्षेत्रातील मोकळी जागा दयनीय आहे. ३ चौरस मीटर प्रति व्यक्ती आहे,  ती जागतिक आरोग्य संघटना आणि अमृत (अटल मिशन) यांनी ठरवलेल्या निकषांपेक्षा (प्रति व्यक्ती ९ ते १० चौरस मीटर) कमी आहे. नवी मुंबई महापालिकेने ‘सिडको'कडून उर्वरित सर्व मोकळ्या जागा ताब्यात घेऊन त्या ग्रीन झोनमध्ये विकसित कराव्यात, अशी मागणी बी. एन. कुमार यांनी केली आहे.

दरम्यान, एक प्रकरण म्हणजे नेरुळ, सेक्टर ५४, ५६, ५८ येथील सीआरझेड बहुल असलेला २५,००० चौरस मीटर भूखंड-२ महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये नागरी सेवा आणि खुल्या मैदानासाठी चिन्हांकित होता. परंतु, ‘सिडको'ने त्यासाठी निविदा काढली, अशी बाब निदर्शनास आणून देतानाच बी. एन. कुमार यांनी आयुवत शिंदे यांनी सिडको, सरकारकडे महापालिका साठी भूखंड राखून ठेवण्याचा आग्रह धरला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘सिडको'च्या भूखंडावर अनधिकृतपणे डेब्रीज टाकण्याचा प्रयत्न