म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
होळीच्या पोळ्या गरजूंना केल्या दान
नवी मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नवी मुंबईतील सानपाडा शाखा, घणसोली शाखा, उलवे शाखा व बेलापूर शाखा यांनी होळीच्या १३५०पोळ्या गोळा करून गरजूंना दिल्या.
‘होळी करा लहान, पोळी करा दान' उपक्रम २४ मार्च रोजी घणसोली, सानपाडा, उलवे व कळंबोली येथे महाराष्ट्र अंनिस व बाबाजी अंदोरे यांच्या नेतृत्वाखालील शिव संघर्ष प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीपणे नवी मुंबईत राबविण्यात आला. होळीत अर्पण होणारी पोळी गरजूंना देणे हा विवेकी विचार कृतीत आणण्यात आला. आपले काही समाज बांधव गरीबीमुळे सण उत्सव साजरे करू शकत नाही. त्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार केला पाहिजे. समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना सुध्दा आपल्या आनंदात सामील करून घेतले पाहिजे. सण उत्सव सर्वाना सोबत घेऊन, सहभागी करून साजरे करूया असा संदेश दिला. नागरिकांनी होळी करा लहान, पोळी करा दान' उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला. अभियानात पांडुरंग सरोदे, दिव्या सरोदे, प्रेम सरोदे, ऋषिकेश वाघमारे, विजय साबळे, प्रदीप कासुर्डे, रोहित कांबळे, गजानंद जाधव, उत्तम रोकडे, निखिल, समीप पाटील, ज्योती क्षिरसागर, राजेंद्र पंडित, सी. जे. लेपांडे, किरण जोशी, जे. डी. गवई, कुमार भिवगडे, अशोक निकम या कार्यकत्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.