आ. मंदाताई म्हात्रे यांनी साजरी केली महिलांसोबत धुळवड

नवी मुंबई : ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी महिलांसोबत होळी आणि धुलीवंदनाचा सण त्यांच्या निवासस्थानी साजरा केला. यावेळी आपल्या पारंपारिक वेशभूषेत आलेल्या बंजारा समाज, राजस्थानी महिला आणि कोळी महिला या प्रमुख आकर्षण होत्या. कोळी बँड तसेच राजस्थानी गाण्यांच्या ठेक्यावर सर्वांचेच पाय थिरकताना दिसले.

हिंदू सणांपैकी प्रमुख असलेला होळीचा सण दरवर्षी अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. यावेळी माजी नगरसेविका अनिता शेट्टी, समाजसेविका उषा दत्त, समाजसेविका ज्योती पाटील, सुहासिनी नायडू, अश्विनी घंगाळे, लाजवंती भोसले, आरती राऊळ, शीतल जगदाळे, ममता सिंग, देविका, सोनाली कदम, स्मिता सावंत, शकुंतला शर्मा तसेच शेकडो महिला उपस्थित होत्या.

सालाबादप्रमाणे यावर्षीही होळी आणि धुलीवंदनाचा सण साजरा केला जात आहे. तसेच धुलीवंदनाच्या निमित्ताने नवी मुंबईतील बंजारा समाज, राजस्थानी लोकगीते, कोळी बँडच्या धुमधडाक्यात रंगांची उधळण करत होळीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आलेला आहे. होळी हा रंगांचा सण आहे; परंतु सावधानता पाळणे अधिक गरजेचे आहे. आजकाल रसायनयुक्त रंगामुळे खूप नुकसानांना सामोरे जावे लागते. चुकीच्या रंगामुळे डोळ्यांना हानी पोहोचू शकते. त्यामुळे रसायन मिसळले रंग न वापरता ऑरगॅनिक सेंद्रिय रंगाचा वापर करावा. तसेच सावधानतेने एकमेकांना रंग लावावे. कोणाची इच्छा नसेल तर उगाच जबरदस्ती रंग लावू नये. शक्य असेल तर फुलांच्या वर्षावाने धुळवड साजरी करावी. आजकाल होळी सारख्या सणांना भांडण होण्याचे प्रमाण वाढले आहे. होळी आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे आणि तो तसाच साजरा केला, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर, तळोजा वसाहतीत धुळवड जोरात