शहीद दिनी महापालिकेतर्फे स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली

कल्याण : थोर स्वातंत्र्य सैनिक भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांचा स्मृतीदिन त्यांच्या स्मरणार्थ शहीद दिवस म्हणून सर्वत्र ओळखला जातो. २३ मार्च रोजी आलेल्या भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या पुण्यतिथी दिनी महापालिकेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

महापालिका मुख्यालयात आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड, उपायुक्त अवधूत तावडे, उपायुक्त रमेश मिसाळ,  विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव यांनी भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या समयी उपस्थित  माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सहा.आयुक्त तुषार सोनावणे, हेमा मुंबरकर, सहा.सुरक्षा अधिकारी सुरेश पवार तसेच इतर कर्मचारी वर्ग यांनी देखील भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एमजेपीच्या जीर्ण झालेल्या जलवाहिनी फुटलेल्या स्थितीत