पलेमिंगो पक्षी पाणथळी जागांच्या शोधात

उरण : उरण  खाडीकिनारी असलेल्या अनेक पाणथळी जागा पाणी बंद करुन किंवा मातीचा भराव टाकून नष्ट केल्या जात आहेत. त्यामुळे उरण परिसरात येणाऱ्या हजारो पक्षांनी नवीन पाणथळी जागांचा शोध सुुरु केला आहे. उरण परिसरातील सकस आहार आणि पोषक वातावरणामुळे येणाऱ्या पर्यटक पक्षांमधील पलेमिंगो पक्षी  सर्वांचाच आकर्षणाचा भाग ठरला आहे. मात्र,  पलेमिंगो पक्ष्यांना उरण परिसरात पाणथळ जागा सापडत नसल्याने पक्षीप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

उरण तालुका नैसर्गिक संपत्तीने नटलेला परिसर आहे. या निसर्गात येथील वन्यजीव अधिकच भर टाकत असतात. उरण तालुवयातील पाणजे- डोंगरी या खाडी भागातील पाणवठ्यावर हजारो पलेमिंगोंसह विविध पक्षांच्या शेकडो प्रजाती पाहायला मिळतात. परदेशी पक्षी देखील मोठ्या संख्येने या भागात येत असल्याने पक्षीप्रेमी, पक्षी अभ्यासक, छायाचित्रकार तसेच निसर्ग प्रेमी मोठ्या संख्येने येथे येत असतात. सकस आहार आणि पोषक वातावरण येथे असल्याने पलेमिंगो पक्षी हजाराेंच्या संख्येने याठिकाणी जलविहार करताना पाहायला मिळतात. मात्र, येथे असणाऱ्या उच्चदाबाच्या विद्युतवाहिन्या सध्या पलेमिंगी पक्षांना जीवघेण्या ठरु लागल्या आहेत.

पाणजे- डोंगरी या खाडी भागात विद्युत वाहिन्यांचे मोठे टॉवर असून, विहार करताना विद्युत वाहिन्यांच्या संपर्कात येऊन विजेच्या धक्क्याने पक्षांना प्राण गमवावे लागत आहे. पाणजे- डोंगरी या खाडी भागात दररोज २ ते ४ पक्षांचा विजेचा धक्का लागून मृत्यू होत असल्याचे पक्षीप्रेमींचे म्हणणे आहे. याबाबत वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने पक्षीप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

उरण तालुक्यातील पाणथळीवर १०८ प्रकारच्या प्रजातींचे सुमारे ५ लाख पेक्षा अधिक विविध प्रकारचे पक्षी येतात. पाणजे- डोंगरी खाडी परिसर फिडींग ग्राऊंड नसून तो बिडींग ग्राऊंड, नर्सिंग ग्राऊंड आणि प्रॉपर डेस्टिनेशन देखिल आहे. पाणजे- डोंगरी खाडी परिसरात काही पक्षी निव्वळ उपजिविकेसाठी येतात. पाणजे- डोंगरी खाडी  परिसरातील अनेक पाणवठे नष्ट करण्यात आल्याने या ठिकाणी येणाऱ्या पक्षांची मोठी पंचाईत झाली आहे. अन्नाच्या शोधात, पाण्याच्या शोधात येथे आलेल्या परदेशी पक्षांची तडफड सुरु आहे. उरण तालुका पाणजे- डोंगरी खाडी परिसरात येणाऱ्या पलेमिंगो, पेंटेड स्टोर्क, ईबीस, स्पुनबिल, ओपन हेडबिल यासारख्या पक्षांमुळे वन्यजीव प्रेमी, पक्षीप्रेमी आणि पक्षी निरीक्षकांमध्ये प्रसिध्द होते. पाणजे- डोंगरी खाडी परिसरात येणाऱ्या पक्षांचे निरीक्षण, अभ्यास आणि छायाचित्र काढणाऱ्यांची येथील किनाऱ्यावर गर्दी होत होती. मात्र, आता  उरण तालुवयातील पाणवठ्याचे भाग नष्ट होऊ लागले आहेत.

उरण तालुक्यातील भेंडखळ पाणथळी, सावरखार पाणथळी, पागोटे पाणथळी, बेलपाडा पाणथळी, दास्तान फाटा येथे भराव झाल्यामुळे अगोदरच येथील पक्षांची आश्रयस्थाने नष्ट झाली आहेत. त्यातच आत्ता पाणजे पाणथळ सुकविल्याने पक्षींप्रेमीद्वारे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कळंबोलीत राष्ट्रीय कायदा महोत्सव साजरा