एफ.जी. नाईक महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात साजरे

नवी मुंबई :  श्रमिक शिक्षण मंडळ संचालित एफ. जी. नाईक महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आरंभ २०२४ द बिगिनिंग या कार्यक्रमाचे आयोजन विष्णुदास भावे नाट्यगृह येथे १८ मार्च रोजी करण्यात आले होते. त्याचे उद्‌घाटन माजी खासदार संजीव नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यार्थी वर्गामधील कलाकारांनी जोशपूर्ण सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली.

सदर प्रसंगी नवी मुंबई मनपा शिक्षण मंडळ माजी सभापती ई. ए.पाटील, नवी मुंबई भाजप शिक्षक सेल अध्यक्ष मुकेश पष्टे, न्यू मॉडेल स्कूलचे बसवराज लच्याने, माजी नगरसेविका भारतीताई पाटील, सौ सायलीताई शिंदे, माजी नगरसेवक लीलाधर नाईक, केशव म्हात्रे, समाजसेवक दाजी सणस, टि.के. टोपे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ प्रकाश सावंत, श्रमिक शिक्षण मंडळाचे सदस्य कु.आदिती नाईक, नरेंद्र म्हात्रे, क्रीडा व्यवस्थापक सुधीर थळे, रा.फ.नाईक विद्यालय प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका राजश्री मोरे, इंग्रजी विभाग मुख्याध्यापिका सीमा म्हात्रे, सुमती सुबय्या, रा.फ.नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा.रवींद्र पाटील,  एफ. जी. नाईक महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. डॉ दत्तात्रय घोडके, प्रा. सीमा शिंदे, प्रा. रूपाली कानवडे, प्रा. प्राजक्ता सावंत, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-पालक उपस्थित होते.

याप्रसगी डॉ. संजीव नाईक यांनी त्यांच्या भाषणातून श्रमिक शिक्षण मंडळाच्या वमहाविद्यालयाच्या एकूण प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत संस्था ही संख्येपेक्षा गुणवत्तेला प्राधान्य देत असून महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा व सामाजिक उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे म्हणून त्यांना प्रोत्साहित केले जाते याबद्दल संस्थेचे व महाविद्यालयाचे कौतुक केले.  प्रास्ताविकपर भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच सांस्कृतिक विविधता, कलाकृतीची नाविन्यता याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देणे व आंतरमहाविद्यालयीन, महाविद्यालयीन स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे व त्यांचा सर्वांगीण विकास करणे हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे नमूद केले. यावेळी महाविद्यालयातील प्रा डॉ दत्तात्रय घोडके व शिक्षकेत्तर कर्मचारी रमेश कदम, योगेश भोपी यांचा महाविद्यालयातील पदोन्नतीसाठी तसेच विशेष गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सर्व स्पर्धांमध्ये भाग घेऊन सुरेख कलात्मक नृत्याविष्कार सादर केले. काही विद्यार्थ्यांनी आपल्या सुरेल स्वरांमध्ये उपस्थित मान्यवरांना भक्ती गीते, भावगीते, देशभक्तीपर गीते सादर करीत श्रवणीय पर्वणीच दिली. स्त्रियांच्या विविध समस्या व स्त्री सक्षमीकरण, न्यायालयीन कायदे याचा आढावा घेणारे कलाविष्कारही यावेळी सादर करण्यात आले. वेगवेगळ्या प्रकारच्या संगीत वाद्यांच्या थीमवर विद्यार्थ्यांच्या फॅशन शो चेही सादरीकरण यावेळी पार पडले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या प्रा जयश्री दहाड व विद्यार्थी वैष्णवी पिसाळ, मयूर थोरात, रेश्मा हातकर, स्नेहा बेल्हे, श्रद्धा कासारे, ज्योती पाटील यांनी केले; तर सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख योगिता पाटील यांनी मानले. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

पर्यावरण सेवा योजनेंतर्गत महापालिकांच्या चार शाळांमध्ये व्याख्यानाचे आयोजन