३० वर्ष जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेण्याचे आवाहन
सायलेन्सर बदलून कर्णकर्कश आवाज
नवी मुंबई : वाहनांचे मुळ सायलेन्सर बदलून कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सीवुड्स वाहतुक नियंत्रण शाखा तर्फे सुरुवात करण्यात आली आहे.
नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांच्या कर्णकर्कश आवाजाने नागरिक त्रस्त झाले आहेत. याची दखल घेऊन सीवुड्स वाहतुक नियंत्रण शाखा द्वारे कर्णकर्कश आवाज येणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. अनेक कॉलेज तरुण यांच्या वाहनांचे सायलेन्सर बदली करुन कर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरचा वापर करत होते. याबाबत वारंवार तक्रारी येत असल्यामुळे सीवुड्स वाहतुक नियंत्रण शाखा अखेर ‘ॲक्शन मोड'वर आली.
सायलेन्सर बदलून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या चारचाकी ६ आणि दुचाकी ३ मिळून ९ वाहनांवर सीवुड्स वाहतुक नियंत्रण शाखा तर्फे १५ मार्च रोजी कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्या सर्व वाहनांचे सायलेन्सर ताब्यात घेण्यात आले असून, यापुढेही सायलेन्सर बदलून कर्कश आवाज करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली जाणार आहे, असे ‘सीवुड्स वाहतुक नियंत्रण शाखा'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा धामापूरकर यांनी सांगितले.