दादर-पंढरपूर ‘रेल्वेे'चा सांगोला-मिरज मार्गे सातारा पर्यंत विस्तार

कल्याण : दादर येथून पंढरपूर येथे जाणाऱ्या दादर-पंढरपूर-दादर या एक्सप्रेस रेल्वेचा विस्तार व्हाया सांगोला, मिरज, सांगली मार्गे सातारा पर्यंत विस्तार करण्यात आला आहे. सदर रेल्वे आज १५ मार्चपासून सुरु होणार असल्याने ठाणे कल्याणसह आसपासच्या विभागातील वारकऱ्यांसह इतर प्रवाशांची सोय होणार आहे. या बाबतचे प्रसिध्दीपत्रक ‘मध्य रेल्वे'ने प्रसिध्द केले आहे. सदर रेल्वे सुरु करण्यासाठी ‘भाजपा'चे कल्याण शहर उपाध्यक्ष सुधीर वायले आणि वारकऱ्यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यानंतर कपिल पाटील यांनी रेल्वे प्रशासनाला दिलेल्या निर्देशानुसार सदर रेल्वे सुरू झाली असल्याचे वायले यांनी सांगितले.  

ट्रेन नं.११०२७ दादर-पंढरपूर गाडी आठवड्यातून रविवार, सोमवार आणि शुक्रवारी धावणार आहे. सदर रेल्वे दादर येथून रात्री ११.५५ मिनिटांनी निघून सकाळी ८.३० वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. पुढे हीच रेल्वे, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठेमहंकाळ, मिरज, सांगली, भिलवडी, किर्लोस्करवाडी, ताकारी, कराड, मसुर, कोरेगाव येथे थांबा घ्ोत सातारा येथे दुपारी २.१० वाजता पोहोचेल. परतीला रेल्वे ट्रेन नं.११०२८ सातारा-दादर, सातारा येथून दुपारी ३.२० वाजता निघून सर्व थांबे घ्ोवून व्हाया मिरज, सांगोला मार्गे रात्री ९.३५ वाजता पंढरपूर येथे पोहोचून नंतर दादर कडे रवाना होणार आहे.

विस्तारीत सातारा-दादर रेल्वे सोमवार, मंगळवार आणि शनिवारी धावेल तर दादर-सातारा रेल्वे रविवार, सोमवार आणि शुक्रवारी धावणार आहे. या विस्तारीत रेल्वे मुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

या रेल्वे सेवेसाठी ‘श्री ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय वारकरी सेवाभावी ट्रस्ट'च्या वतीने ह.भ.प. पांडुरंग माळी, ह.भ.प. बाळकृष्ण जोशी, हरी बाबर, अरविंद गोसावी यांच्यासह इतर वारकऱ्यांनी भाजपा शहर उपाध्यक्ष सुधीर वायले यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भेट घेतली होती. यानंतर कपिल पाटील यांनी रेल्वे प्रशासनाला दिलेल्या निर्देशानुसार सदर रेल्वेसेवा सुरु करण्यात आली. त्यामुळे ना. कपिल पाटील यांचे वायले यांनी आभार मानले आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 खारघर मधील अनधिकृत ४० घरांची पक्की चाळ, २  इमारती जमीनदोस्त