दिवाळे मधील ३२ महिलांना स्वयंरोजगारासाठी गाळे वाटप

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील संपूर्ण देशातील गावांचे ‘स्मार्ट व्हिलेज'चे स्वप्न तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘गांव दत्तक योजना'च्या अंतर्गत ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी ‘स्मार्ट व्हिलेज'करिता नवी मुंबईतील दिवाळे गांव दत्तक घेतले आहे. त्यानुसार नवी मुंबईतील पहिले स्मार्ट व्हिलेज म्हणून दिवाळे गावाला बहुमान मिळाला आहे. स्मार्ट व्हिलेज अंतर्गत गावाचा विकास आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यामतून झपाट्याने सुरु असून महिला दिनाचे औचित्य साधून ७ मार्च रोजी येथील फळ-भाजी व्यवसाय विक्रेत्या ३२ महिलांना गाळे सुपूर्द करण्यात आले. 

महिलांना सक्षम आणि स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आ. सौ. मंदाताई म्हात्रे या नेहमी प्रोत्साहन देत असतात. आमदार निधीतून तब्बल ९२ लाख रुपये खर्च करुन त्यांनी ३२ महिलांना व्यावसायिक गाळे उपलब्ध करुन दिले. महिलांच्या पंखांना बळ देण्यासाठी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे पुढे सरसावल्या आहेत. त्या कणखर अणि पोलादी नेतृत्व म्हणून नवी मुंबईतून पुढे आल्या आहेत. तसेच त्यांनी संघर्षमय प्रवास करुन इथपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे महिलांना करावा लागणारा संघर्ष  पूर्णपणे ठाऊक असून आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी महिला उद्योजिकांना प्रोत्साहन दिले आहे.

महिला दिनानिमित्त ३२ महिलांना लॉटरी पध्दतीने गाळे वाटप करुन सदर गाळ्यांच्या चाव्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते सुपूर्द केल्या. यावेळी उद्‌घाटक म्हणून नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर उपस्थित होते. याप्रसंगी महापालिका शहर अभियंता संजय देसाई, कार्यकारी अभियंता संजय पाटील, उपअभियंता अजय पाटील, कनिष्ठ अभियंता कांचन वानखडे, सहा. आयुक्त शशिकांत तांडेल यांच्यासह अनंता बोस, निळकंठ कोळी, तुकाराम कोळी, चंद्रकांत कोळी, सुरेखा कोळी, पांडुरंग कोळी, श्याम कोळी तसेच शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

महिलांनी फक्त चुल आणि मुल यापुरतेच मर्यादित न राहता प्रत्येक क्षेत्रात पुढे यायला पाहिजे. त्यातील महत्त्वाचे क्षेत्र म्हणजेच व्यवसाय होय. व्यवसायात देखील महिलांनी पुढे येऊन चांगली प्रगती करावी. महिलांनी स्वतःला सक्षम आणि कणखर बनवले पाहिजे. महिलांनी मेहनतीने आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करावा.  - सौ. मंदाताई म्हात्रे, बेलापूर.

व्यवसाय करावा, माझे स्वप्न होते. परंतु, योग्य जागा मिळत नव्हती. आता मंदाताईमुळे व्यवसायासाठी जागा मिळाली आणि हाताला कामही मिळाले. - बेबी कोळी, भाजी विक्रेती.

व्यवसाय खूप मोठा करायचे ध्येय आहे. १९९० पासून रस्त्यावर भाजी विकत होते. रस्त्यावर व्यवसाय करताना अनेक संकट आली. त्यावर मात करुन व्यवसाय नियमित सुरु ठेवला. मंदाताईच्या आमदार निधीतून गाळा मिळाला. आता व्यवसाय खूप मोठा करायचा आहे. मंदाताई यांचे आभार आणि खूप आनंद झाला वाटतो. - सुनंदा कोळी, भाजी विक्रेती. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कल्याण तळोजा 12 मेट्रोच्या कामाला अवघ्या आठवड्याभरात सुरुवात