आगळ्या वेगळ्या आयोजनाने साजरा केला मराठी भाषा दिन

नवी मुंबई :  कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस निमित्त २७ फेब्रुवारी रोजी विद्यालयात यंदा इयत्ता ६ वी मधील  विद्यार्थी वर्ग सभेने एक निर्धार करून कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस एक उत्सव म्हणून साजरा केला. प्रमुख पाहुणे, दीप प्रज्वलन, सूत्र संचालन, काव्य आणि भाषण सादरीकरण, अध्यक्ष निवड, सूचक, अनुमोदक आणि आभार प्रदर्शनदेखील सर्व मुलांनीच केल्यानं सर्व उपस्थीत विद्यार्थी, शिक्षक आणि पालक वर्गाने टाळ्यांच्या गजरात मुलांचे अभिनंदन केले.

  स्नेहल साळुंखे अध्यक्ष, कार्यक्रम प्रमुख म्हणून, श्रावणी हिरवे, सूत्रसंचालन समीक्षा जाधव, प्रसाद माळी, स्वरा जगताप यांनी कविता सादर  केल्या; तर वेदांत शिंदे, शिवानी बुगडे या मुलांनी भाषण केले. कुसुमाग्रज यांच्या जीवनावर चित्र सादरीकरण गौरी रोडे आणि आदिनाथ जंगमने केले. आभार प्रदर्शन आदिती करपे या मुलीने मानले. सर्व मराठी शिक्षक, सौ.स्वाती भाये, वर्ग शिक्षिका सौ. प्रियंका देवरे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. मराठी भाषा गौरव दिवस निमित्ताने ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांच्या माझ्या मराठीचा बोल, वाजे काळजात खोल हया मराठी गीताने कार्यक्रमाची सुरुवात प्रसाद माळी याने करून टाळ्या घेतल्या. मुख्याध्यापक रवींद्र पाटील, उपमुख्याध्यापिका सौ.चारुशीला चौधरी आणि पर्यवेक्षक अनंत ओवळेकर यांनी हया विद्यार्थी सभेबद्दल मुलांचे अभिनंदन केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ऐन वायू प्रदूषणावेळी हवा गुणवत्ता केंद्र बंद?