वुमन्स वॉकेथॉनला ऐरोलीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

 नवी मुंबई : नमो चषक 2024 अंतर्गत 150, ऐरोली विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित वुमन्स वॉकेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.  ऐरोलीमधील हजारो महिलांनी वॉकेथॉनमध्ये उत्साही सहभाग नोंदवून निरोगी आयुष्यासाठी  खेळ खेळण्याचा संदेश दिला.

 नवी मुंबई भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी हिरवा कंदील दाखवून वॉकेथॉनचा  शुभारंभ केला तर माजी खासदार संजीव नाईक यांच्या उपस्थितीमध्ये  या क्रीडा स्पर्धेची जल्लोषात  सांगता झाली. भारतीय जनता पक्षाचे ऐरोली तालुका मंडळ अध्यक्ष अशोक पाटील, माजी नगरसेविका संगीता पाटील व अन्य मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.  

सेक्टर 14 शिव राधा कृष्ण मंदिर येथून वॉकेथॉनचा शुभारंभ झाला. पारंपारिक वेशभूषेतही महिला सहभागी झाल्या होत्या.  लेक व्ह्यू सोसायटी सेक्टर 14, गणपती मंदिर सेक्टर 15,  अभ्युदय  बँक वेलकम स्वीट समोर अशाप्रकारे विविध भागात फिरून अडीच किलोमीटरची ही स्पर्धा सेक्टर 15 येथील चौकामध्ये संपन्न झाली. विजेत्या स्पर्धकाला सोन्याची नथ भेट देण्यात आली. ११ पैठण्यांची   सोडत   खास आकर्षण होते. सहभागी सर्व महिलांना विशेष भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 

नवी मुंबईत नमो चषकासाठी एक लाखाहून अधिक नागरिकांची नोंदणी - जिल्हाध्यक्ष संदीप नाईक 

नवी मुंबईमध्ये नमो चषकाचं आयोजन विविध नोडमध्ये, विविध खेळ  प्रकारांमध्ये आणि विविध वयोगटातल्या श्रेणीमध्ये करण्यात आल्याची माहिती यावेळी नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दिली. ऐरोली मतदारसंघामध्ये जवळपास १ लाखांहून अधिक नागरिकांनी नमो चषकामध्ये नोंदणी केली. ज्येष्ठ नागरिक, तरुणांकरिता, महिलांकरिता, विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा होत्या. क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ, व्हॉलीबॉल, चित्रकला अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करत असताना वुमेन्स वॉकथॉन या स्पर्धेचे आयोजन अशोक पाटील, संगीता पाटील ऐरोली येथील भाजपा कोअर टीम यांनी यशस्वीरीत्या केलं. महिलांकरिता आयोजित नवी मुंबईतील ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. सर्व वयोगटातील महिलांचा सहभाग या स्पर्धेमध्ये बघायला मिळाला. स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांचा खेळत सहभाग वाढावा, फिटनेस टिकवावा, हा  उद्देश यामागे आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘सुलेखन प्रदर्शन'द्वारे मराठी भाषेचा गौरव