व्हॅलेंटाईन डे'ला ५४ जण ‘लग्नाच्या बेडीत'

ठाणे : ‘व्हॅलेंटाईन डे'चे औचित्य साधत भारतीय कोर्ट मॅरेजचा मुहूर्त साधण्याचा अभिनव प्रकार ठाणे मधील विवाह नोंदणी कार्यालयात दरवर्षी होतात. यंदा यात एका वेगळ्याच प्रेमविवाहाची नोंदणी झाली. सातासमुद्रापलीकडून भारतात येऊन ठाणे मधील २ तरुणींशी प्रेमविवाह केल्याची नोंद झाली आहे. महत्वाचे म्हणजे ५८ ते ६० वर्षे वयोगटातील २ घटस्फोटीत जोडपी असून २ ठाणेकरणींनी चवक फॉरेनचा नवरा पटवून त्यांनी ‘व्हॅलेंटाईन डे' दिनी स्वतःच्या नवीन संसाराला सुरुवात केली.

लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात, असे म्हटले जाते. तरीही लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी विवाहेच्छुक मंडळींकडून लग्नासाठी मुहूर्त पाहिले जातात. आता १४ फेब्रुवारी रोजी ‘व्हॅलेंटाईन डे'चा मुहूर्त साधून ठाणे मधील विवाह उपनिबंधक कार्यालयात नववधूवरांसह २ घटस्फोटीत जोडपी आणि २ फॉरेनर वरांसोबत दोघी जणी असे ५४ जण १४ फेब्रुवारी रोजी लग्नाच्या बेडीत अडकले.

प्रेमी-प्रेमिकांच्या उत्साहाचा दिवस असलेल्या ‘व्हॅलेंटाईन डे'चे स्तोम बरेच माजले आहे. प्रेमी युगलांना आपल्या प्रेमाचे अंतिम ध्येय म्हणजे शुभविवाह ‘व्हॅलेंटाईन डे'ला व्हावे, असे वाटत असते. अनेक प्रेमीयुगुले ‘व्हॅलेंटाईन डे'चा मुहूर्त साधण्यासाठी प्रतिक्षा करीत असतात. ठाणे पश्चिम येथील तलावपाळी परिसरात विवाह नोंदणी साठी दुय्यम सहनिबंधक कार्यालयात होते. जिल्ह्याभरातून इथे विवाहेच्छुक मंडळी विवाह नोंदणीसाठी येत असतात. १४ फेब्रुवारी रोजी ‘व्हॅलेंटाईन डे'चा मुहूर्त साधत या विवाह नोंदणी कार्यालयात नववधुवर आणि वऱ्हाडी मंडळी यांची झुंबड उडाली होती. यावेळी तब्बल ५४ जोडपी लग्नाच्या बेडीत अडकली. यात ५८ ते ६० वयोगटातील दोन घटस्फोटीत जोडपे असून २ ठाणेकर वधुंनी फॉरेनच्या मुलासोबत आपली लग्नगाठ बांधली आहे.

दरम्यान, गतवर्षी ‘व्हॅलेंटाईन डे'ला ३४ जणांनी विवाह केला होता, तर यंदा ५४ जण लग्नाच्या बेडीत अडकले, अशी माहिती विवाह उपनिबंधक संजय भोपे यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

६५० कोटींच्या विविध विकासकामांचे  भूमीपुजन