रस्ता सुरक्षा सफ्ताहानिमित्त नवी मुंबईत पिंक रिवोलुशन कार रॅलीचे आयोजन


नवी मुंबई : रस्ता सुरक्षा सफ्ताह आणि जागतिक कॅन्सर दिवसाचे औचित्य साधून नवी मुंबई आरटीओ, इनरव्हील क्लब नवी मुंबई, संगीनी सेंच्युरीयन डिस्ट्रिक्ट 314 आणि  पिंक होलिक इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पिंक रिवोलुशन कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या आगळ्या वेगळ्या कार रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विविध क्षेत्रातील महिलांनी रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती केली.  
रस्ता सुरक्षा सफ्ताहानिमित्त नवी मुंबई आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातूनव नागरिकांमध्ये जनजगृती करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी नवी मुंबई आरटीओने रस्ता सुरक्षा सफ्ताह आणि जागिक कॅन्सर दिनाचे औचित्य साधुन पिंक होलिक इंडिया यांच्या विद्यमाने पिंक र्लोय्शुन कार रॅलीचे अओजन केले होते. या रॅलीमध्ये कॅन्सर बाबत जनजागृती, रस्ता सुरक्षा, स्वच्छ सुंदर नवी मुंबई, महीला सक्षमीकरण अशा विविध विषयांने सजावट केलेल्या कार घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या. त्याशिवाय काही महिला दुचाकी, महीला रिक्षा चालक, मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटना, तसेच विविध महिला ग्रुप यामध्ये सहभागी झाले होते.  
सदर रॅली नवी मुंबईतील गजबजलेल्या ठिकाणावरुन फिरवण्यात आली. यावेळी रस्ता सुरक्षेची माहिती असलेले पत्रक देखील वाटप करण्यात आले. सदर रॅलीमध्ये नवी मुंबईच्या उपप्रादेशीक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, डिस्ट्रिक्ट वाईस प्रेसिडेंट, प्रेरणा रायचूर, डॉ. सत्काशी चटर्जी, डॉ. जेसिका शाह अपोलो कॅन्सर केअर सेंटर, रोटरी क्लब ऑफ सी साईड प्रेसिडेंट राम पांडे, डॉ. संजय गोयल आर्यावार्ता फाउंडेशन, यांची प्रमुख उपस्थिती होती. यशस्वी करण्यासाठी आशिष दार्गुडे, चंद्रमोहन चिंतल, प्रशांत शिंदे तसेच जयश्री शेलार संस्थापक पिंकहोलिक इंडिया फाउंडेशन, अजित कौर दील्होन सह संस्थापक यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच कीर्ती चौधरी आणि रीचा भार्गव यांनी जजिंग केले. विजेत्यांना हेल्मेट, क्लब महिंद्रा हॉलिडेचे कूपन तसेच रोख पारितोषिके देण्यात आली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बेलापूर मध्ये दुमदुमणार "ब्रास बॅण्ड" महोत्सवाचा आवाज