नवी मुंबई मधील पर्यावरण प्रेमींना फुले, फळे झाडे प्रदर्शनाची प्रतीक्षा

 वाशी : बृहन्मुंबई, ठाणे, मिरा- भाईंदर आदी महापालिकांनी फळे, फुले झाडांचे प्रदर्शन भरवले असताना नवी मुंबई महापालिका मात्र याबाबतीत मागे राहिली आहे.त्यामुळे नवी मुंबई शहरात फुले, फळे झाडे प्रदर्शन कधी भरवले जाणार? , असा सवाल नवी मुंबई शहरातील पर्यावरण प्रेमी करत आहेत. नवी मुंबई मध्ये २०२० साली शेवटचे फुले, फळे झाडे प्रदर्शन भरवण्यात आले होते.

नवी मुंबई सुनियोजित शहर असून, या शहरातील नागरिकांमध्ये वृक्षप्रेम वाढीस लागावे, यासाठी नवी मुंबई महापालिका दरवर्षी फळे, फुले, भाजीपाला आणि उद्यान प्रदर्शन भरवते. यामध्ये शेकडो प्रकारची आकर्षक फुले, फळे झाडे ठेवण्यात येतात. तसेच औषधी वनस्पतींसाठी स्वतंत्र दालन असते.त्यामुळे फुल,फळ झाडे पाहण्याची पर्वणी नवी मुंबई मधील नागरिकांना मिळते. मात्र, २०२० पासून नवी मुंबई शहरात फुले, फळे झाडे प्रदर्शन भरवण्यात आले नाही. २०२० मध्ये नेरुळ मधील वंडर्स  पार्क मध्ये फुले, फळे झाडे प्रदर्शन भरवले गले होते. मात्र, त्यानंतर आलेल्या कोविड संसर्ग आणि लादलेले निर्बंध यामुळे फुले, फळे झाडे प्रदर्शन मध्ये खंड पडला. परंतु, २०२२ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व कोविड निर्बंध हटवले आहेत. त्यानंतर नवी मुंबई शहरालगत बृहन्मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर आदी महापालिकांनी फळे,फुले झाडांचे प्रदर्शन भरवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, फुले, फळे झाडे प्रदर्शनाचा नवी मुंबई महापालिका उद्यान विभागाला विसर पडल्याने पर्यावरण प्रेमी नाराजी व्यक्त करत आहेत.
नवी मुंबई शहर कॉस्मोपॉलिटीयन शहर आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरात देशातील विविध भागामधील नागरिक वास्तव्यास येतात. असतात. फळे, फुले झाडे प्रदर्शनातून नवी मुंबई शहरातील झाडे, फुले सोबतच इतर झाडे, फळे, फुलांची माहिती एकाच ठिकाणी भेटत असते. त्यामुळे नवी मुंबई महापालिका उद्यान विभागाने फळे, फुले झाडे प्रदर्शनात खंड न पाडता यंदा फळे, फुले झाडे प्रदर्शन भरवून पर्यावरण प्रेमींची नाराजी दूर करावी, अशी अपेक्षा आहे. - बाळासाहेब शिंदे, अध्यक्ष - पर्यावरण सेवा भावी संस्था, नवी मुंबई. 

 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पाणजे, टीएस चाणवय, माहुल येथे पक्षी अभयारण्य स्थापण्याचा निर्णय