कॅन्सर रुग्णांसाठी १ हजारापेक्षा अधिक रक्ताची पाकीटे उपलब्ध

खारघर : कॅन्सर  रुग्ण संख्येत सातत्याने होणारी वाढ तसेच कॅन्सरग्रस्त रुग्णांना रक्ताची गरज लागत असल्यामुळे  खारघर मधील युवा प्रेरणा सामाजिक संस्था तर्फे खारघर येथील टाटा हॉस्पिटल मधील कॅन्सर रुग्णांसाठी गेल्या १२ वर्षात १ हजारापेक्षा अधिक रक्ताची पाकिटे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

जगभरात दरवर्षी ४ फेब्रुवारी रोजी ‘जागतिक कर्करोग दिन' साजरा केला जातो. बदलत्या जीवनशैलीतून ‘कॅन्सर'चा विळखा आता आबालवृध्दांमध्ये जडताना दिसत आहे. दरम्यान, दुर्धर आजारांपैकी एक म्हणून कॅन्सर रोगाकडे पाहण्याच्या दृष्टीमुळे या आजाराबाबत अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. या आजारावर मात करुन पुन्हा आयुष्य नव्याने जिंकण्याची आशा बाळगणाऱ्यांच्या उत्साहाला बळकटी देण्यासाठी खारघर मधील टाटा कॅन्सर हॉस्पिटल द्वारे विविध उपक्रम राबविले जात आहेत.

खारघर मधील टाटा कॅन्सर हॉस्पिटल मध्ये देशातील विविध भागातून कॅन्सर उपचारासाठी रुग्ण दाखल होत असताना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराचे रुग्णांना रक्ताची गरज लागत असल्यामुळे ‘युवा प्रेरणा सामाजिक संस्था'चे अध्यक्ष किरण पाटील यांनी २०१० साली स्वातंत्र्यदिनी ‘टाटा कॅन्सर हॉस्पिटल'च्या सहकार्याने खारघर वसाहतीत रक्तदान शिबीर राबविले. या शिबिरात जवळपास पन्नास रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. शिबिरात गोळा झालेले रक्त कॅन्सर रुग्णांस उपयोगी आल्याचे पाहून किरण पाटील दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी तसेच त्यांच्या पत्नी नेत्रा किरण पाटील या दरवर्षी जन्मदिनी कॅन्सर शिबीर आयोजित करुन संकलित झालेल्या रक्त पिशवी खारघर मधील टाटा कॅन्सर हॉस्पिटल मध्ये कॅन्सर रुग्णांसाठी उपलब्ध करुन देत आहेत.

खारघर मधील टाटा कॅन्सर हॉस्पिटल मध्ये कॅन्सर रुग्णांसाठी गेल्या १२ वर्षात ‘युवा प्रेरणा सामाजिक संस्था' द्वारे एक हजाराहून अधिक रक्ताची पाकिटे उपलब्ध करुन देण्यात आल आहेत, असे ‘संस्था'चे अध्यक्ष किरण पाटील यांनी सांगितले. ‘युवा प्रेरणा सामाजिक संस्था' तर्फे राबविल्या जाणाऱ्या रवतदान शिबीर उपक्रमाचे माजी खासदार रामशेठ ठाकूर,आमदार प्रशांत ठाकूर यांनी कौतूक केले आहे.

कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी घेतल्या जाणाऱ्या रक्तदान शिबिरासाठी खारघर मधील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद  मिळत असतो. रवतदान शिबीर उपक्रम कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. रक्तदान मुळे काही व्यक्तींना पुन्हा जन्म मिळत असेल तर त्यासाठी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्या व्यक्तीचा मोठा सहभाग आहे. - किरण पाटील, अध्यक्ष - युवा प्रेरणा सामाजिक संस्था, खारघर. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘शासन आपल्या दारी' उपक्रमाला नवी मुंबईत उत्साही प्रतिसाद