मराठा समाज-खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणास २ फेब्रुवारी पर्यत मुदतवाढ

ठाणे : महाराष्ट्रातील ‘मराठा समाज'चे मागासलेपण तपासणीचे काम महाराष्ट्र शासनातर्फे ‘राज्य मागासवर्ग आयोग'कडे सोपविण्यात आले आहे. यानुसार राज्यातील सर्व ग्रामीण शहरी भागातील मराठा समाज आणि खुल्या समाजातील नागरिकांचे सर्वेक्षण २३ जानेवारी २०२४ पासून सुरु झाले आहे. संपूर्ण शहरात सदरचे काम सुरू असून या कामाची मुदत २ फेब्रुवारी २०२४ पर्यत वाढविण्यात आली आहे.

सदरचे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फत ‘राज्य मागासवर्ग आयोग'ने दिलेल्या सॉपटवेअर ॲप्लीकेशन द्वारे करण्यात येत आहे. यानुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचे नागरिकांचे सर्वेक्षण महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. याकामी २५० पर्यवेक्षक आणि जवळपास ४००० प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संबंधित प्रभाग कार्यालय कडील सहायक आयुक्त वॉर्डस्तरीय नोडल ऑफिसर आणि कार्यालयीन अधीक्षक सहाय्यक वॉर्डस्तरीय नोडल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे अधिनस्त प्रभाग स्तरावरील सर्वेक्षणाचे कामकाज केले जात आहे.

सदर सर्वेक्षणाकरिता नागरिकांसाठी महापालिका मार्फत हेल्पलाईन सुविधा (८६५७८८७१०१) उपलब्ध करुन देण्यात आली असून या सुविधेद्वारे नागरिक सर्वेक्षणाबाबत काही सूचना असल्यास यावर नोंद करु शकतील. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ‘राज्य मागासवर्ग आयोग'च्या वतीने सुरु असलेल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

शासनाच्या वतीने महापालिकेने नियुक्त केलेले प्रगणक ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व कुटुंबांचे ‘मागासवर्ग आयोग'च्या निर्देशानुसार करीत आहे. संपूर्ण शहरातील नागरिकांचे सर्वेक्षण व्हावे यासाठी सदर कामास २ फेब्रुवारी पर्यत मुदतवाढ देण्यात आली असून सर्वेक्षणास ठाणेकर नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. -अभिजीत बांगर, आयुवत-ठाणे महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

न्हावा शेवा टप्पा-३ मधील पाईपलाईन बदलण्याच्या कामाला लवकरच गती -ना. गुलाबराव पाटील