गुरूवारी ठाण्यात पाणी नाही

गुरूवारी ठाण्यात पाणी नाही

 ठाणे  : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा  व वागळे (काही भागात) प्रभागसमिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत्‍ बारवी गुरूत्व वाहिनीचे कटाई नाका ते कल्याण फाटा येथे तातडीचे दुरूस्तीचे काम हाती घेतल्यामुळे गुरुवार दि.01/02/2024 रात्री 12.00 ते शुक्रवार दि. 02/02/2024 रात्री 12.00 वाजेपर्यत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

            सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31 चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी.

            ठाणे महानगरपालिकेमार्फत सदर पाणीकपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवघर ग्रामपंचायततर्फे नागरिकांना कचरा कुंडीचे वाटप तसेच आरओ प्लॅन्टचे उदघाटन