पनवेल मध्ये डॉ. आंबेडकर जयंती दिमाखात साजरी

पनवेल : पनवेल महापालिका आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्या माध्यमातून लोकसहभागातून ढोल-ताशा, चित्ररथासहीत भव्य मिरवणूक पनवेल शहरात काढण्यात आली. त्याचबरोबर महापालिका तर्फे निबंध, वक्तृत्व स्पर्धा अशा कार्यक्रमांचे आयोजन करुन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.

सकाळी ७.३० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिवत आयुक्त भारत राठोड, सहाय्यक संचालक नगररचना अधिकारी ज्योती कवाडे, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त स्वरुप खारगे, मुख्य लेखा-वित्त अधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, लेखा अधिकारी संग्राम व्हारेकाटे, उपलेखाधिकारी संदीप खुरपे, सामान्य प्रशासन विभाग प्रमुख दशरथ भंडारी, लोकप्रतिनिधी, नागरिक, आदिंनी अभिवादन केले.

यानंतर ढोल-बॅण्ड पथकाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चित्ररथ बनविण्यात आले होते. याबरेाबरच सावित्रीबाई महिला मंडळ, रमाबाई महिला मंडळ यांनी सामुहिक गायन केले. या मिरवणुकीची सांगता डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाजवळ करण्यात आली. तर समारोपाचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन मध्ये संपन्न आला.

याठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली. याप्रसंगी लोकप्रतिनिधी महापालिका अधिकारी-कर्मचारी, शिक्षक, विविध संस्थांचे सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डॉ. आंबेडकर स्मारकस्थळी अभिवादनासाठी नागरिकांचा ओघ