चैत्रपालवी विशेषांक गझलकार आप्पा ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशित

नवी मुंबई : अप्पा जोशी प्रतिष्ठान अंतर्गत नवी मुंबई साहित्य परिषद आणि अखिल भारतीय साहित्य परिषद  ह्यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडव्यानिमित्त चैत्रपालवी विशेषांक प्रकाशन सोहळा ११ एप्रिल रोजी वाशी येथील योग विद्या निकेतन ह्या ठिकाणी संपन्न झाला. ह्या प्रकाशन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध गझलकार आप्पा ठाकूर आमंत्रित होते. याप्रसंगी साहित्य मंदिर चे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी हेही उपस्थित होते.

सरस्वती, गुढीपूजन, महात्मा ज्योतिबा फुले ह्यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  आप्पा ठाकूर ह्यांचा परिचय श्रीमती कल्पना देशमुख ह्यांनी करून दिला. सौ.ऋतुजा रवींद्र गवस ह्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. तसेच  साहित्यप्रेमीची, नियमितपणे लेखन करणारे यांची नावे जाहीर केली. आप्पा ठाकूर, डॉ.नंदकिशोर जोशी, डॉ. अरुंधती जोशी ह्यांच्या हस्ते त्या सर्वांचे सत्कार करण्यात आले. चैत्रपालवी विशेषांक मुखपृष्ठ तयार करणारे चित्रकार, रांगोळीकार श्रीहरी पोवळे ह्यांचाही सन्मान करण्यात आले. नवी मुंबई साहित्य परिषद संस्थापक डॉ.नंदकिशोर जोशी ह्यांच्या हस्ते आप्पा ठाकूर ह्याना शाल श्रीफळ आणि भेट देऊन सन्मानित करण्यात आले. आप्पा ठाकूर ह्यांनी  आशयघन गझला सादर केल्या. करार, वि्ील ह्या गझलेची रसिकांनी यावेळी हमखास मागणी केली. सूत्रसंचालन  संतोष मिसाळ ह्यांनी केले; तर सौ.ज्योती जाधव ह्यांनी आभार मानले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल मध्ये डॉ. आंबेडकर जयंती दिमाखात साजरी