आवक मध्ये वाढ; एपीएमसी धान्य बाजारात ज्वारी दरात घसरण

 वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) धान्य बाजारात ज्वारीची आवक वाढल्याने दर घसरले आहेत. किलोमागे आठ ते दहा रुपयांनी ज्वारीचे भाव कमी झाले आहेत. त्याचसोबत गहू दरावर देखील ज्वारी दराचा परिणाम झाला असून, गहू दर देखील कमी झाले आहेत.

मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) धान्य बाजारात ज्वारीचा नवीन हंगाम सुरु झाला असून, यात सोलापुरी ज्वारीची आवक वाढली आहे. एपीएमसी धान्य बाजारात आधी ६४ ते ९६ रुपये किलो दराने ज्वारी विकली जात होती. तर आता दर घसरल्याने ज्वारी ५४ ते ८४ रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे.

दरम्यान, एपीएमसी धान्य बाजारात ज्वारी दर घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळत आहे. त्यामुळे ग्राहक ज्वारी अधिक खरेदी करत आहेत, अशी माहिती एपीएमसी धान्य बाजारातील व्यापारी शैलेश जडेजा यांनी दिली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 जुहूगांव मध्ये आज ग्रामदेवता ‘मरिआई देवी'ची जत्रा