नवघर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला डॉक्टर, परिचारिकांची प्रतिक्षा

उरण : ‘रायगड जिल्हा परिषद' आरोग्य विभागाच्या उदासीन धोरणामुळे मागील वर्षापासून नवघर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र डॉक्टर आणि परिचारिकांच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील खेडेगावातील रुग्णांना आपला वेळ, पैसा वाया घालवून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात ये-जा करावी लागत आहे.

‘रायगड जिल्हा परिषद'चे तत्कालीन सदस्य विजय भोईर यांनी आपल्या नवघर  मतदार संघातील लोकांच्या आरोग्याची काळजी घ्ोण्यासाठी ‘जिल्हा नियोजन समिती'च्या फंडातून सुमारे ४८ लाख रुपये खर्च करुन नवघर ग्रामपंचायत हद्दीत २०२२-२३ या वर्षात प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीची उभारणी केली. मात्र, या उपकेंद्रात रिक्त असलेली समुपदेशन अधिकारी (सीएचओ), एएनएम (परिचारिका) आदि पदे मागील वर्षापासून भरली गेलेली नाहीत. त्यामुळे एक आरोग्य सेवकच नवघर, पागोटे, भेंडखळ, बोकडविरा, फुंडे, नवीन शेवा, डोंगरी, पाणजे यासह इतर ग्रामपंचायत हद्दीतील एकूण १० गावातील २१,४६९ लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम करत आहे. परिणामी, रुग्णांची गैरसोय निर्माण होत आहे. त्यामुळे शासकीय निकषांवर आधारित आवश्यक असलेली डॉक्टर, समुपदेशन अधिकारी, एएनएम आणि आरोग्य सेवक यांची रिक्त पदे भरण्यासाठी ‘जिल्हा आरोग्य विभागे' 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पाडवा रॅलीत मतदान जनजागृतीचे रंग