उरण मध्ये रमजान ईद साजरी

उरण : उरण मध्ये ११ एप्रिल रोजी ‘रमजान ईद' उत्साहात साजरी करण्यात आली. ‘रमजान ईद' निमित्त उरण मधील मुस्लीम बांधवांनी नमाज अदा करुन एकमेकांना ‘रमजान ईद'ची शुभेच्छा दिली.

नवी मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त (पोर्ट विभाग) डॉ. विशाल मेहुल आणि ‘उरण पोलीस ठाणे'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रमजान ईद' निमित्त सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

‘रमजान ईद' निमित्त उरण पोलीस स्टेशन जवळ असलेल्या जामा मशिद मध्ये दोन सत्रात मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केला. नमाज झाल्यानंतर उरण पोलीस ठाणे तर्फे सर्व मुस्लीम बांधवांना गुलाब पुष्प देवून ‘रमजान ईद' निमित्त शुभेच्छा देण्यात आली.

याप्रसंगी नवी मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त (पोर्ट विभाग) डॉ. विशाल मेहुल, ‘उरण पोलीस ठाणे'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश निकम, पोलीस निरीक्षक सुर्यकांत कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा घनवट यांच्यासह पोलीस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

उरण मधील खिडकोळी नाका येथील मदरसा-ए-मेहमुदीया येथे सकाळी ७.३० ते ७.५० या वेळेत तर बालई रोड येथील खॅाजा गरीब नवाज सुन्नी हनफी मदरसा येथे सकाळी ७.१५ ते ७.३५ या वेळेत मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उल्हासनगर मधील रस्त्याची दुरवस्था