साठ कवींनी एकत्र येत केला ‘कविता पाडवा' साजरा

नवी मुंबई : सर्वत्र शोभा यात्रा आणि विविध कार्यक्रम होत असताना नवी मुंबईत साहित्य मंदिर येथे गुढी पाडवा निमित्त ‘पाडवा कवितेचा' हा उपक्रम यंदा कविता डॉट कॉमच्या माध्यमातून राबवला गेला व  हा प्रथम एक असा उपक्रम आहे, ज्यात सर्व काव्य प्रेमी ठाणे, रायगड आणि नवी मुंबई मधून एकूण साठ कवींनी एकत्र येत नवीन वर्ष साजरा केले.

      कार्यक्रमास जेष्ठ कवी आप्पा ठाकूर, साहेबराव ठाणगे, लेखिका सौ.वृषाली मगदूम, सिने अभिनेता अशोक पालवे, डॉ.अजित मगदूम, सुभाष कुलकर्णी, सौ.कल्पना गोसावी आणि इतर मान्यवर हजर होते. शिव तुतारी प्रतिष्ठानचे बोध चिन्ह अनावरण प्रसंगी सुभाष कुलकर्णी यांनी मत व्यक्त केले की, सर्व नवीन कवींना घेऊन, त्यांना संधी देत, व्यासपीठ देण्याचे काम ‘कविता डॉट कॉम' गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रभर करत आहे, ही एक काव्य चळवळ, लोक कळवळा घेवून समाज बांधत आहे, हा खूप आनंद आहे. एकूण चार तास चाललेला हा कार्यक्रम मनाला सुखाहून जात आहे, कुणी कुणाला ऐकून न घेण्याचा, उभे न करता आडवं करण्याच्या जमान्यात कवींना त्यांचा सत्याचा आवाज व्यक्त करता येत आहे, ही आनंद देणारी बाब आहे, असे मत ज्येष्ठ गजलकार आप्पा ठाकूर यांनी व्यक्त केले.

    कार्यक्रम प्रसंगी ‘कविता डॉट कॉम' कडून कविता कशा सादर कराव्यात याचा वस्तुपाठ म्हणून लहान कवी मुले, प्रसाद माळी, परी लाड, आणि रूद्राक्ष पातारे यांनी कविता सादरीकरण करून ‘कविता डॉट कॉम' च्या यशाचे रहस्य उलगडले. निर्मिती सूत्रधार म्हणून प्रा. रवींद्र पाटील यांनी सांगितले की, आपण कामातून आणि कानातून स्वतःला ऐकून बोलावं,जे पुढे कार्यातून आणि मनातून समाज समजून घेतो, आपण आपणास सिध्द केले की मग प्रसिद्ध होत जातोय, ‘कविता डॉट कॉम'चे वाडा, वस्ती, यात्रा जत्रा, पार चावडीवर कार्यक्रम करण्याचें जे व्रत आहे, ते आजन्म असेल. कवी जितेंद्र लाड यांनी काव्यातूनच सांगितले की, दोघांच्या गावातले अंतर जरी आहे, तू माझा, मी तुझा खांदेकरी आहे. हीच भूमिका आपण घेत आहोत आणि त्यात आम्ही तृप्त आहोत.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राबलेल्या ‘कविता डॉट कॉम' परिवाराचे वैभव वर्हाडी यांनी आभार मानले आणि पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

निवडणूक मोसमात निसर्गावर हल्ले?