जांभळी पाडा येथील देवीचे जल्लोषात स्वागत

ठाणे : ‘आनंद चॅरिटेबल ट्रस्ट'च्या वतीने आयोजित होत असलेल्या जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे गुढीपाडवा आणि नुतन वर्षाच्या प्रारंभी देवीचे आगमन मोठ्या जल्लोषात करण्यात आले. या मिरवणुकीत देवीच्या आगमनासाठी ३०० हुन अधिक पथक तसेच संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून वारकरी सांप्रदायाचे वारकरी पथके, झांज पथक, बँड पथक, दांडपट्टा, महिलांचे आणि पुरुषांचे लेझीम पथक, घोडेस्वार, मावळे, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन चालणाऱ्या महिला, आदि देवीच्या स्वागतासाठी सामील झाले होते.

यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनीही भवतीपूर्वक देवीचा रथ ओढून देवीचे स्वागत केले. याप्रसंगी खासदार राजन विचारे, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख केदार दिघे, प्रमुख प्रदीप शिंदे, प्रवक्ते अनिश गाढवे, ठाणे उपशहरप्रमुख दीपक साळवी, युवासेना उपजिल्हा अधिकारी अर्जुनसिंग डाभी, युवासेना अधिकारी किरण जाधव, माजी नगरसेवक मंदार विचारे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, विभाग संघटक अपूर्वा तेलवणे, नंदा कोथळे, सुनंदा देशपांडे, उप विभाग संघटक राजेश्री सुर्वे, मेघा विचारे, वनिता कोळी तसेच ठाणे, नवी मुंबई आणि भाईंदर मधील माजी नगरसेवक, विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, युवासेना, युवती सेना यांच्यासह ‘शिवसेना'चे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सुप्रिम कोर्टातील सुनावणीकडे पनवेलकरांचे लक्ष