संजोग वाघेरे-पाटील यांची ‘शोभायात्रा'ला भेट

पनवेल : कामोठे रहिवासी सामाजिक संस्था, ओम शिव शंकर सेवा मंडळ, जय हरी महिला मंडळ आयोजित मराठी नववर्ष, गुढीपाढवा सणानिमित्त काढलेल्या ‘शोभायात्रा'मध्ये मावळ लोकसभा मतदार संघातील ‘महाविकास आघाडी'चे उमेदवार संजोग वाघेरे यांनी उपस्थिती दर्शवली. कामोठेवासियांनी संजोग वाघेरे-पाटील यांना उत्स्फुर्त प्रतिसाद देत त्यांचे स्वागत केले. अनेकांनी उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्या सोबत सेल्फी काढून शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी माजी आमदार बाळाराम पाटील, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, ‘राष्ट्रवादी'चे नेते सुरदास गोवारी, माजी नगरसेवक प्रमोद भगत, आदि उपस्थित होते.

मराठी नववर्ष स्वागतानिमित्त ठिकठिकाणी ‘शोभायात्रा' काढण्यात आल्या होत्या. त्या त्या ठिकाणी ‘महाविकास आघाडी'चे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांना निमंत्रण देण्यात आले होते, त्यानुसार सदर ठिकाणी वाघेरे-पाटील यांनी धावती भेट दिली. कामोठे रहिवासी सामाजिक संस्था, ओम शिव शंकर सेवा मंडळ, जय हरी महिला मंडळ आयोजित ‘शोभायात्रा'मध्ये शिवशंकर मंदिरात भगवान श्री शंकराचे दर्शन घेऊन ‘शोभायात्रा'मध्ये सामील झालेल्या संजोग वाघेरे-पाटील यांचे नागरिकांकडून ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले.

अनेकांनी आपल्या लाडक्या नेत्यासोबत सेल्फी काढून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संजोग वाघेरे-पाटील यांनी मावळ मतदार संघातील सर्व नागिरकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन ‘शोभायात्रा'मधील कला प्रकार पाहून कलाकारांचे कौतुक केले. यावेळी कामोठे आदिवासी संघाचे सदस्य, ‘महाविकास आघाडी'चे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जांभळी पाडा येथील देवीचे जल्लोषात स्वागत