बेकरी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या बंद्यांना प्रमाणपत्र वाटप

ठाणे : ठाणे कारागृहात बंदिस्त बंद्यांना कारागृह प्रशासनाने दिलेल्या विविध प्रकारच्या प्रशिक्षणामुळे कारागृहातून लाकडी वस्तू, शेती व्यवसाय याच्या सोबतच पाककला प्रशिक्षणही देण्यात आले. सदर प्रशिक्षण पूर्ण करुन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या बंद्यांना ३ एप्रिल रोजीच्या नियोजित कार्यक्रमात प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमात ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली.

यापूर्वी ठाणे कारागृहात राबविण्यात आलेल्या उपक्रमात गांधी सर्वोदय मंडळ यांच्या तर्फे आयोजित गांधी विचारधारेवर आधारित परीक्षेमध्ये उत्तीर्ण बंदी आणि अँक्झोनोबेल इंडीया प्रा. कंपनी तर्फे आयोजित डेकोरेटीव्ह वॉल पेंटींग प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या बंद्यांना देखील मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे कारागृह अधीक्षक राणी भोसले, टीस्सा अध्यक्षा सुजाता सोपारकर, मानद महासचिव निनाद जयवंत यांच्या उपस्थितीत बेकरीआणि डेकोरेटिव्ह वॉल पेंटींग प्रशिक्षण आणि उत्पादन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या बंद्यांना प्रमाणपत्र वाटप केले. सदर कार्यक्रमाला उपधीक्षक डी. टी. डाबेराव, वरिष्ठ तुरुंग अधिकारी के. पी. भवर यांच्यासह तुरुंग कारखाना व्यवस्थापक यु. सी. सोमण यांची उपस्थिती होती.

प्रशिक्षणार्थी बंद्यांनी बनविली २५ विविध बेकरी उत्पादने...
ठाणे मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने कारागृहात बंदिस्त असलेल्या बंद्यांना कारागृहातून बाहेर पडल्यानंतर त्यांचे सामान्य जीवन व्यथित करण्यासाठी आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटावा, याच उद्देशातून बंद्यांना प्रशिक्षण देण्यात येते. कारागृहात विविध उपक्रम राबविण्यात येतात. यातील एक भाग म्हणून ठाणे मध्यर्ती कारागृह आणि चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यामाने कारागृहातील बंद्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येते. २२ फेब्रुवारी ते २८ मार्च, २०२४ या कालावधीत राबविण्यात आलेल्या उपक्रमात कारागृहातील २५ बंद्यांची निवड करुन त्यांना बेकरी उत्पादनाचे प्रशिक्षण देण्यात आलेले होते. या दरम्यान बंद्यांनी तब्बल २५ प्रकारची बेकरी उत्पादने तयार केली. यात केक, बिस्कीट, ब्रेड, बेसन नानकटाई, चॉकलेट बॉलस, चॉकलेट, मार्बल केक यांचा समावेश आहे.

ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या कारखान्यात बंद्यांना विविध पध्दतीचे प्रशिक्षण देण्यात येते. कारागृहात बंदिस्त असलेल्या जास्तीत जास्त बंद्यांना प्रशिक्षण देण्याचा मानस कारागृह प्रशासनाचा आहे. बंद्यांची मुक्तता झाल्यानंतर या प्रशिक्षणाचा फायदा त्यांना उदरनिर्वाहासाठी व्हावा, असा उद्देश आहे. -राणी भोसले, अधीक्षक-ठाणे कारागृह. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे'च्या सेवा वेळेत ८ एप्रिल पासून बदल