नमुंमपा दिंडी स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धेची १५ सप्टेंबर रोजी अंतिम फेरी
क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांनी दाखवली खेळांमधून चमक
नवी मुंबई : एफ जी नाईक वाणिज्य माहिती तंत्रज्ञान व कला महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव २० व २१ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झाला. आपल्या प्रास्ताविकपर भाषणात महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रताप महाडिक यांनी सांघिक भावना जपत खेळ खेळण्यास विद्यार्थ्यांना प्रेरित केले व उत्तमोत्तम खेळ खेळत विद्यार्थ्यांनी आपले उज्वल भविष्य घडवत महाविद्यालयाचे व देशाचे नाव झळकवावे असे आवाहन केले. कार्यक्रम प्रसंगी उपस्थित झालेले राष्ट्रीय खेळाडू व माजी विद्यार्थी कुमार तेजस व कुमारी पूजा यांनी आपापल्या भाषणामध्ये आपले संघर्ष व महाविद्यालयांनी त्यांना दिलेली साथ व प्रोत्साहन यांचा त्यांच्या यशामध्ये सिंहाचा वाटा असल्याचे नमूद केले.
या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन कॉलेजच्या माजी विद्यार्थी व राष्ट्रीय खेळाडू कु.तेजस कदम, कु.पूजा फरगडे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी रा. फ.नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र पाटील, उप-मुख्याध्यापिका श्रीमती चारुशीला चौधरी व पर्यवेक्षिका सौ कुरणे, क्रीडा शिक्षक पष्टे, मयूर पलांडे, संदीप शिकारे व शुभम दळवी उपस्थित होते. क्रीडा महोत्सवांमध्ये क्रिकेट, खो खो, कबड्डी, रीले ,बॅडमिंटन ,चेस कॅरम या खेळांच्या स्पर्धा झाल्या. त्यांमधून विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला व या क्रीडा महोत्सवाची शोभा वाढविली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सीमा शिंदे यांनी केले.