शिवसेना उरण ने जपली सामाजिक बांधिलकी

उरण : आर झुंनझुंवाला ट्रस्ट यांच्या माध्यमातून  शंकरा व्हिजन सेन्टर, पनवेल येथे शिवसेना उरण तर्फे 17 नागरिकांच्या मोफत डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर सर्व रुग्णांनी व त्याच्या नातेवाईक यांनी माजी आमदार मनोहर भोईर व माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, नगरसेवक अतुल ठाकूर, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, शहरप्रमुख  विनोद म्हात्रे, अल्पसंख्याक सेलचे विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम व सर्व शिवसेना टीम चे आभार मानले आहेत. 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या तत्वाने शिवसेना कार्यरत आहे. याचा प्रत्यय उरण मधील नागरिकांना आला आहे.

शिवसेना गटनेते गणेश शिंदे यांच्या कार्यालयाच्या तळ मजल्यावर सुरू करण्यात आलेल्या या आरोग्य सोयीमध्ये गरिबांना मोफत डोळे तपासणी व मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे असे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार 17 नागरिकांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया दिनाकं 05 जून 2022 रोजी शंकरा व्हिजन सेन्टर येथे यशस्वी पार पडली व तेथील सर्व उत्तम सुविधा बद्दल शस्त्रक्रिया वेळी प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या तालुका उपाध्यक्ष रुबिना कुट्टी यांनी शंकरा व्हिजन सेन्टरचे  सचिन भूमकर, डॉ  गिरीश बुधराणी, डॉ राजेश कापसे, डॉ सचिन सर व कर्मचारी यांचे आभार मानले आहेत