नेरुळ मध्ये आणखी ५ पलेमिंगोचा मृत्यू, ७ जखमी

नवी मुंबई : डीपीएस तलावाजवळ २५ एप्रिल रोजी पहाटे ५ पलेमिंगो पक्षी रहस्यमयरित्या मृत तर ७ जखमी अवस्थेत आढळून आल्याने पक्षीप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी कमालीचे हादरले आहेत. यामुळे नेरुळ विभागामध्ये एका आठवड्यात मृत पलेमिंगोची संख्या ८ वर पोहोचली आहे. 

मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनी व्हॉटस्‌ॲप ग्रुपवर अलर्ट वाजवताच, वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशन (WWA) मधील पक्षी बचावकर्ता सनप्रीत सावर्डेकर आणि त्यांची टीम कृतीत उतरली. त्यांनी जखमी गुलाबी पक्ष्यांना ठाणे मानपाडा येथील रुग्णालयात हलवले आहे. वन विभागाने ७ मृतदेह ताब्यात घेऊन पनवेल येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत, असे परिक्षेत्र वन अधिकारी सुधीर मांढरे यांनी सांगितले. 

दरम्यान, ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'ने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सदर घटनांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची आणि नवी मुंबईतील पलेमिंगो शहरातील जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी योग्य पावले उचलण्याची विनंती केली आहे. ‘नॅटकनेवट'चे संचालक बी. एन. कुमार यांनी आठवडाभरात एव्हीयन पाहुण्यांचा समावेश असलेली सदरची दुसरी शोकांतिका असल्याचे सांगितले. यापूवार्ी १९ एप्रिल रोज ३ पलेमिंगो मृत आणि एक जखमी अवस्थेत आढळून आला होता. 

यासंदर्भात बी. एन. कुमार यांनी १४१ वर्षे जुनी संशोधन संस्था बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) कडे देखील सदरचा मुद्दा उचलून धरला आहे. तसेच नवी मुंबई महापालिका आयुक्त आणि राज्य मँग्रोव्ह सेल यांना सतर्क केले आहे. 
दरम्यान, याप्रकरणी परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आणि कारवाई सुचवण्यासाठी पथक घटनास्थळी पाठवले जाईल, अशी माहिती अतिरिवत प्रधान मुख्य वनसंरक्षक व्ही. एस. रामाराव यांनी दिली आहे.

‘नॅटकनेवट'ने डीपीएस पलेमिंगो तलाव, एक आंतर-भरतीसंबंधीचा ओलसर जमीन, पाण्याचे प्रवेश अवरोधित केल्यामुळे कोरडे राहत असल्याची बाब संबंधितांच्या  निदर्शनास आणून दिली आहे. नेरुळ जेट्टीच्या रस्त्याखाली तलावाच्या दक्षिणेकडील एक भाग रस्त्यात गाडला गेला असून सदरची जलवाहिनी पुन्हा सुरु करणे आवश्यक आहे.

-बी. एन. कुमार, संचालक-नॅटकनेवट फाऊंडेशन.

डीपीएस तलावातील पाण्याचा प्रवाह पुन्हा सुरु करण्याची विनंती नवी मुंबई महापालिका आणि सिडको यांना करण्यात येत आहे. कोरड्या डीपीएस पलेमिंगो तलावात अन्न न मिळाल्याने आणि उडणाऱ्या हेल्टर-स्केल्टर मुळे पक्षी विचलित होत असावेत, असा पक्षीप्रेमींचा अंदाज आहे.

रेखा सांखला, सेव्ह पलेमिंगोज ॲन्ड मँग्रोव्हज. 

‘बीएनएचएस'चे उपसंचालक डॉ. राहुल खोत यांनीही रस्त्यावर येणाऱ्या पलेमिंगोच्या घटना आणि पलेमिंगोंच्या मृत्यू आणि जखमी होण्याबद्दल धक्का बसला आहे. बीएनएचएस नवी मुंबईतील पाणथळ जागा योग्य आरोग्यासाठी राखण्यासाठी आग्रही आहे. भरतीच्या वेळी ठाणे खाडी पलेमिंगो अभयारण्य (TCFS) येथून पलेमिंगो येथे येतात. नवी मुंबईतील पाणथळ जमीन खाडीपेक्षा किंचित उंच जमिनीवर आहे.

-डॉ. राहुल खोत, उपसंचालक-बीएनएचएस. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

फेरीवाल्यांना मारहाण करणाऱ्या उपायुक्तांवर कारवाईची मागणी