बेलापूर विधानसभा मतदार संघात नमो संवाद कॉर्नर सभा

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने छोट्या-छोट्या कॉर्नर सभांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला जावा याकरिता ‘भारतीय जनता पार्टी'चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नमो संवाद कॉर्नर सभा आयोजित करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने १५१-बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली बेलापूर मंडळातील सीबीडी, सेक्टर-६ मार्केट, शांतीवन सोसायटी आणि दिवाळे गावातील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र या ठिकाणी नमो संवाद कॉर्नर सभा पार पडल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले कार्य म्हणजे गरीब जनतेकरिता प्रत्येक पैसा गरीब कल्याणासाठी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गासाठी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये १० टवव्ोÀ आरक्षण, अमृत योजना, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, जल जीवन मिशन योजना, वन नेशन वन रेशन कार्ड योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना अशा अनेक योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब, तळागाळातील जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन देशभरातील कोट्यवधी जनतेला दिलासा दिल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. तसेच प्रत्येक विभागातील समस्या जाणून घेत स्थानिक नागरिकांसोबत संवाद साधला.

दरम्यान, राज्यभरामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून छोट्या सभांच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहचण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईकरिता केलेले विकास कार्य याची प्रचिती पाहता सीबीडी येथील जसमीत तोमर सहित असंख्य कार्यकर्त्यांनी ‘भाजपा'मध्ये पक्ष प्रवेश केला.

युक्रेनमध्ये शिक्षणासाठी (िं्‌ल्म्ीूग्दह) भारतातील विद्यार्थी मोठ्या संख्येने गेले होते. रशिया-युक्रेन युध्दामुळे जवळपास २० हजार विद्यार्थी युक्रेनच्या विविध शहरांमध्ये अडकले होते. या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या सुरक्षिततेची काळजी वाटत होती. सदर विद्यार्थी मायदेशात परत येण्यासाठी सरकारकडे मदतीची मागणी करत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनी मोदी सरकारकडे ‘भारत सरकारने आमच्या मुलांना मायदेशी परत आणावे', अशी विनंती केली होती. यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या निर्देशानुसार केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा नावाची मोहीम आखून सदर विद्यार्थ्यांना भारतात सहीसलामत परत आणल्याचे आमदार सौ. म्हात्रे यांनी सांगितले.

याप्रसंगी ‘भाजपा'चे माजी जिल्हाध्यक्ष सी. व्ही. रेड्डी, माजी नगरसेवक अशोक गुरुखे, डॉ. जयाजी नाथ, माजी नगरसेविका सुरेखा नरबागे, जसप्रीत सिंग, तनसुख जैन, मनुभाई, ज्येष्ठ कार्यकर्ता गोपाळराव गायकवाड, डॉ. शिरुरकर, सुभाष गायकवाड, संजय ओबेरॉय, रवी ठाकूर, ‘जेष्ठ नागरिक संस्था'चे अध्यक्ष चंद्रकांत कोळी, ‘मनसेे'चे बेलापूर विभाग अध्यक्ष भूषण कोळी, शाम कोळी, कुमार कोळी, तुकाराम कोळी, पांडुरंग पाटील, गंगेश कोळी, एकनाथ कोळी, महादेव कोळी, हेमंत कोळी (नाईक), ‘एकविरा महिला मच्छिमार संस्था'च्या अध्यक्षा सुरेखा कोळी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि नागरिक उपस्थित होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘आचारसंहिता'चे उल्लंघन होणार नाही याकडे लक्ष द्या