‘एपीएमसी'चे शीतगृह सुरु होण्यास दिरंगाई

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) प्रशासनाने वाशी सेक्टर-१९ मध्ये शीतगृह बांधले आहे. सदर शीतगृह भाड्याने देण्याचा निर्णय डिसेंबर-२०२३ मध्ये एपीएमसी संचालक मंडळाने घेतला आहे. मात्र, या निर्णयाला पाच महिने होत आले तरी ‘एपीएमसी'चे शीतगृह भाड्याने देण्याच्या तांत्रिक प्रमियेत अडकल्याने ‘एपीएमसी'चे शीतगृह कधी सुरु होणार?, असा प्रश्न ‘एपीएमसी' मधील घटकांद्वारे उपस्थित केला जात आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार पेठ म्हणून वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) ओळखली जाते. त्यामुळे ‘एपीएमसी' आवारात हजारो शेतकरी त्यांचा शेतमाल विक्री साठी आणतात. त्यानंतर एपीएमसी मार्वेÀट मधील व्यापारी शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करुन त्याची दुबार विक्री द्वारे मुंबई आणि उपनगरात वितरीत करतात. त्यासोबतच बराच शेतमाल तसेच सुका मेवा परदेशात निर्यात केला जातो. मात्र, शेतमालाची साठवणूक करण्यास शीतगृहाची गरज लागते. त्यामुळे एपीएमसी मार्वेÀट मधील व्यापारी खाजगी शीतगृहाचा आसरा घेतात. सदर बाब लक्षात घेऊन व्यापाऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने एपीएमसी प्रशासनाने वाशी सेक्टर-१९मधील भूखंड क्रमांक-२ वर शीतगृह बांधण्याचा निर्णय घेतला. त्यास २०१३ मध्ये प्रशासकीय मंजुरी घेतली.

सदर शीतगृह ३० कोटी खर्च करुन २०१८ मध्ये बांधून तयार होते. मात्र, भोगवटा प्रमाणपत्राअभावी शीतगृह सुरु करण्यात आले नव्हते. परंतु, सदर इमारतीस  २०२३ मध्ये भोगवटा प्रमाणपत्र  प्राप्त झाले आहे. त्यानंतर सल्लागार मे. न्युट्रिस प्रोजेक्ट इंजिनियर्स, कन्सल्टन्स यांनी सादर केलेल्या मूल्यांकनानुसार एपीएमसी प्रशासनाने सदर शीतगृह भाड्याने देण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबत जाहिरात देखील प्रसिध्द करण्यात आली आहे. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव सदर शीतगृह भाड्याने देण्याची प्रकिया रेंगाळली असल्याने सदर शीतगृह सुरु होण्यास दिरंगाई होत आहे.

‘एपीएमसी'चे शीतगृह सुरु झाल्यास खाजगी शीतगृहांवर परिणाम?

नवी मुंबई,वाशी मधील एपीएमसी बाजारात राज्य आणि देशाच्या इतर राज्यातील शेतमाल विक्रीसाठी थेट दाखल होतो. त्यानंतर त्या शेतमालाचा मुंबई उपनगरात पुरवठा होतो. मात्र, याच एपीएमसी बाजार लगत काही बाहेरील व्यापाऱ्यांनी शीतगृह उभारले असून, त्यातील अनेक शीतगृह अनधिकृत आहेत. या शीतगृहात फळांची साठवणूक करण्याच्या नावाखाली विनापरवाना फळांची थेट विक्री केली जात आहे. त्यामुळे ‘एपीएमसी'चे शीतगृह सुरु झाल्यास त्याचा एपीएमसी मार्वेÀट लगतच्या अनधिकृत शीतगृहांवर परिणाम होणार आहे .त्यामुळे ‘एपीएमसी'चे शीतगृह सुरु होऊ नये म्हणून काही घटक अर्थपूर्ण दबाव टाकत असल्याची चर्चा एपीएमसी बाजार आवारात सुरू आहे.

----------------------------------------

वाशी, तुर्भे सेक्टर-१९ मधील ‘एपीएमसी'चे शीतगृह भाड्याने देण्यासाठी  निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. ‘एपीएमसी'चे शीतगृह भाड्याने देण्याचा प्रस्ताव प्रक्रियेत असून, लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. - अशोकराव डक, सभापती - मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती, वाशी. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महापालिका आयुक्त डॉ. शिंदे यांचा विकास प्रकल्पांच्या गुणवत्तेवर भर