मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी

पनवेल : लोकसभा निवडणूक-२०२४च्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत १२ एप्रिल रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा भिंगार आणि मोर्बे, खेरणे, पाली देवद येथील शाळेच्या वतीने प्रभातफेरी काढण्यात आली. नवीन पनवेल मधील ७ बचत गटांमधील महिलांच्या बैठकीमध्येही मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांची (सिस्टेमॅटिक वोटर्स एज्युकेशन इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन प्रोग्रॅम) अमंलबजावणी ३३-मावळ लोकसभा मतदारसंघामधील १८८-पनवेल विधानसभा मतदार संघन अंतर्गत महापालिका कार्यक्षेत्र तसेच पनवेल ग्रामीण भागात केली जात आहे. स्वीप आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ आणि स्वीप पथक प्रमुख अधिकारी मुख्य अभियंता संजय जगताप, गटविकास अधिकारी संजय भोये यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती कार्यक्रम राबविले जात आहेत.

गेल्या काही दिवसांपासून महापालिका आणि तहसील कार्यालयाच्या वतीने विविध शाळांच्या माध्यमातून प्रभात फेरीच्या माध्यमातून मावळ लोकसभा मतदारसंघामधील पनवेल विधानसभा मतदार संघ अंतर्गत मतदान जनजागृती केली जात आहे. त्यानुसार १२ एप्रिल रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा भिंगार आणि मोर्बे, खेरणे, पाली देवद येथील शाळेच्या वतीने प्रभातफेरी काढून मतदान जनजागृती करण्यात आली. तसेच मतदान जनजागृतीसाठी नवीन पनवेल येथील ७  बचत गटाच्या महिलांची एकत्रित बैठक घेण्यात आली. यावेळी ८५ वर्षावरील आणि दिव्यांग मतदार यांच्यामध्येही मतदान जनजागृती करण्यात आली. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 ‘भाजपा'कडून मगरीप्रमाणे राज्यस्तरीय पक्ष गिळंकृत