‘भाजपा'कडून मगरीप्रमाणे राज्यस्तरीय पक्ष गिळंकृत

ठाणे: भाजप राज्यस्तरीय मित्रपक्ष गिळून खातो. राजकारणात त्यांना टिकू देत नाही. आजवर ‘भाजपा'ने ज्या ज्या प्रादेशिक पक्षाशी युती केली, त्या पक्षाला संपविणायचे षडयंत्र राबविण्यात येत असल्याचा निखारा ‘राष्ट्रवादी-शरदचंद्र पावर गट'चे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा पेटविला.

आमदार जितेंद्र आव्हाड शरद पवार यांच्या वक्तव्यावर टीका करणाऱ्यांचा आपल्या शैलीत समाचार घेतला. तर देशात दुसरे घुसताहेत, कुणीही बोलण्यास तयार नाही. आज महाराष्ट्रात मराठी माणसाने आपले स्थान गमावल्याची खंत डॉ. आव्हाड यांनी बोलून दाखवली.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी भाजप दिल्ली नेतृत्वावर आगपाखड केली. निवडणुका कर्तुत्वावर लढायच्या असतात. ‘लोकसभा'मधील तुमचा परफॉर्मन्स काय आहे? त्यावर लढवल्या जातात. तुम्ही बोलता किती? तुम्हाला विषयांचा आवक किती? राष्ट्रीय स्तरावर माहिती किती आहे? त्या माहितीवर तुमची बुध्दी कशी चालते? यावर सर्वकाही अवलंबून आहे, असे मत आव्हाड यांनी नाव न घेता बारामतीच्या निवडणुकीबाबत व्यक्त केले.

देशाचे पंतप्रधान मटण, मच्छी आणि बटाटा शिजवा, असे आवाहन करतात. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची लाज गेलेली आहे. भारताच्या सीमारेषेच्या आत चीन २ किलोमीटर घुसला आहे. त्याला कुणी डोळे दाखवत नाही. सत्तदाहरी करतात तरी काय? असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला. केंद्रीय नोकऱ्यांमध्ये २० हजार लोक आलेत. पण, त्यात मराठी माणूस कुठे आहे? मराठी माणसाला स्थानच नसल्याची टीका डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली.

तर कल्याण लोकसभा मतदार संघाबाबत विचारणा केल्यानंतर डॉ. आव्हाड म्हणाले, भाजप इतर पक्षांना गिळंकृत करणारा पक्ष आहे. ज्या ज्या पक्षांनी ‘भाजपा'शी युती केली, ते ते पक्ष भाजपने गिळून टाकले. त्यातच विरोध पक्षच त्यांना नको आहे. ‘भाजपा'ची संस्कृती वेगळी आहे. ते दाखवितात एक आणि करतात एक असे त्यांचे चारित्र्य असल्याची टीकाही डॉ. आव्हाड यांनी शेवटी केली. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त